सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी बिल्डिंगमध्ये दिसलेल्या संशयित तरुणीची ओळख पटली!
Sushant Singh Rajput Death Case : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यावेळी त्याच्या बिल्डिंगमध्ये एक संशयित तरुणी दिसून आली होती. या तरूणीची ओळख पटली आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होते. या फोटो आणि व्हिडीओंमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादरम्यान एका संशयित तरुणी त्याच्या बिल्डिंगमध्ये जाताना दिसली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची ओळख पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओत दिसलेल्या संशयित तरुणीचं नाव जमीला आहे. ही महला रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची मैत्रिण आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यूची माहिती मिळताच, आपले इतर मित्र प्रियंका खेमानी आणि महेश शेट्टी यांच्यासोबत तिथे आली होती. दरम्यान, तिथे असलेल्या पोलिसांनी तिला घरात प्रवेश करू दिला नाही आणि तिथे उपस्थित असलेल्या स्टाफसोबत बोलल्यानंतर ती तिथून निघून गेली.
सुशांतच्या आत्महत्येवेळी बिल्डिंगमध्ये संशयित महिलेचा वावर; सिक्युरिटी गार्डकडून धक्कादायक खुलासे
या फोटोत शौविक चक्रवर्तीसोबत जमीला :
सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये सुशांत आणि रियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शौविक आणि जमीलासोबत इतरही अनेक लोक दिसत आहेत. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे आणि तिच्यावर आत्महत्या करण्यासाठी सुशांतला प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे.
रिया आणि तिच्या कुटुंबियांवर आरोप
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी ईडी देखील चौकशी करत आहे. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाने समाधानी नसलेल्या सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर अनेक घटना समोर आल्या. बिहार पोलिसांच्या शिफारसीनंतर याप्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :