पाकवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर अभिनेता विकी कौशल म्हणतो...
'भारतीय हवाई दल आणि आपल्या गुप्तचर विभागाला सलाम. भारताने स्ट्राईक बॅक केलं. जय हिंद' अशा आशयाचं ट्वीट विकीने केलं आहे. पुलवामात 40 सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी विकी कौशलने शोक व्यक्त केला होता.
काहीच दिवसांपूर्वी पुलवामा हल्ला ही आपल्यासाठी वैयक्तिक हानी असल्याची भावना विकी कौशलने व्यक्त केली होती. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला गमावल्याची भावना होती, असं विकीने सांगितलं होतं. आपल्या मनात दुःख आणि आक्रोश आहे. दहशतवादाला कसं प्रत्युत्तर द्यावं आणि या प्रश्नावर तोडगा कसा काढता येईल, याचं उत्तर जाणून घ्यायचं असल्याचंही विकी म्हणाला होता. घरी बसून यावर बोलणं खूप सोपं आहे, मात्र निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्यांना ते घेऊ द्यात, ते आपल्या भल्यासाठीच असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवूया, दहशतवादाला एकतेने उत्तर देऊया, असं आवाहनही विकी कौशलने त्यावेळी केलं होतं. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'उरी' चित्रपटात भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेचं चित्रण करण्यात आलं आहे. 'ये नया हिंदुस्थान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' अशी या चित्रपटाची टॅगलाईन होती. विकीने पॅरामिलीट्रीतील मेजर विहान सिंह शेरगिलची व्यक्तिरेखा साकारली होती. विकी त्याच्या पथकातील जवानांना 'हाऊज द जोश' असं प्रश्न विचारल्यावर 'हाय सर!' असं जोशपूर्ण उत्तर मिळतं. हा संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे, या सिनेमात मेजर करण कश्यपची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैनानेही 'जय हिंद' असं ट्वीट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर 'भारताच्या वीरपुत्रांनो तुमच्या आत्म्याला शांती लाभो.' असं म्हणत मोहितने राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढले होते.Salute to the #IndianAirForce and our Intelligence Department. #IndianStrikesBack . Jai Hind ????????
— Vicky Kaushal (@vickykaushal09) February 26, 2019
सेलिब्रिटींकडूनही ट्विटरवर भारतीय वायूदलाचा गौरवJai hind ???????? ???????? ????????
— mohit raina (@mohituraina) February 26, 2019
Proud of our #IndianAirForce fighters for destroying terror camps. अंदर घुस के मारो ! Quiet no more! #IndiaStrikesBack
— Akshay Kumar (@akshaykumar) February 26, 2019
Respect @IAF_MCC Indian Air Force... Jai ho !!!
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 26, 2019
BRAVO INDIA ????????????????????????????????
— Rajinikanth (@rajinikanth) February 26, 2019
Our 12 return safely home after wreaking havoc on terrorist camps in Pakistan. India is proud of its heroes. I salute their valour.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 26, 2019
Mess with the best, die like the rest. Salute #IndianAirForce.@narendramodi.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 26, 2019
Salute to the #IndianAirForce for their indomitable spirit in keeping our country safe! Let us all pray for their safety. Jai Hind ????????
— Sanjay Dutt (@duttsanjay) February 26, 2019
जय हिंद ... जय हिंद की सेना !! ???????? Respect @IAF_MCC
— Varun Dhawan (@Varun_dvn) February 26, 2019
Salute to the our armed forces. Jai Hind. ????????????????????????????????????????????????????????????????
— Swara Bhasker (@ReallySwara) February 26, 2019
भारत माता की जय !!! ???????? #IndianArmedForces #Salute भारतीय हूँ, गर्व है।
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 26, 2019
What an explosive morning ! As india celebrates ! I salute the 12 bravehearts for meting out justice for our Pulwama boys ! Our Neighbours often complain of being victims of terrorism themselves .. they need to thank us . ???????????????????????????????????????????????????????? Jai Hind.
— Raveena Tandon (@TandonRaveena) February 26, 2019
JAI HIND!! pic.twitter.com/EFFywzGuRE
— Suniel Shetty (@SunielVShetty) February 26, 2019
नमस्कार करते हैं। ????????????
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) February 26, 2019
A TRULY BEAUTIFUL GOOD MORNING. THANKS @narendramodi SIR AND BRAVEHEARTS OF OUR ARMY . JAI HO . ????????????????????????
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
#BharatMataKiJai ????????
— Mallika Sherawat (@mallikasherawat) February 26, 2019
नयी दिशा नयी दशा.. नयी रीति नयी नीति.. नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन. #ekbharatshreshthbharat https://t.co/m0fIqhxAz6
— Kailash Kher (@Kailashkher) February 26, 2019
Jai Hind ???????? ???????? #IndiaStrikesBack https://t.co/6dmzB7jNyb
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) February 26, 2019
Salute to the daredevil IAF pilots who braved to strike in the heart of our enemy. It's time for all Indians to stand united as one.???????????? #IndiaStrikesBack #JaiHind
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) February 26, 2019
Jai Hind! ????????
— Sonakshi Sinha (@sonakshisinha) February 26, 2019
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात 'जैश ए मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर, धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ आणि मेहुणा युसुफ अजहर यांचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यात हिटलिस्टवर असणाऱ्या 25 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पाकिस्तानात भारताच्या एअर स्ट्राईकनंतर युद्धभूमीवरुन 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात बालाकोटमध्ये असलेले 'जैश ए मोहम्मद'चे 350 दहशतवादी ठार झाले आहेत. 325 दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आलं आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असा ठरला अॅक्शन प्लॅन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या हल्ल्याच्या वेळी अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते. सूत्रांच्या मते दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना काही पर्याय दिले होते. लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा बनवण्यात आले. मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले. मुख्य हल्ला केला त्यावेळी वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला. पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा मेहुणा होता, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असंही त्यांनी सांगितलं.So proud of the Indian Air Force for the precise and befitting reply to reach the perpetrators a lesson. ???????? ????????. This is a new age India. Jai Hind #istandwiththeforces #IndiaStrikesBack #Surgicalstrike2 https://t.co/uLxNE3AV0z
— Aftab Shivdasani (@AftabShivdasani) February 26, 2019