Sunny Movie: ‘सनी’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर साकारणार 'ही' भूमिका; लूक पाहिलात?
विश्वजित मोहिते पाटील ही भूमिका चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा साकारणार आहे.
Sunny Movie: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ (Sunny) या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी ही भूमिका साकारली आहे.
व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट झिम्माच्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.
क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
काही दिवसांपूर्वी सनी चित्रपटातील 'नाचणार भाई' हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. हे गाणंही असाच अनुभव देणारं आहे. असा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकालाच हे गाणं आपल्या 'त्या' दिवसांची आठवण करून देणारं आहे.''
घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. 'होमसिक' बनलेल्या 'सनी'चा एक भावनिक प्रवास यात दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'सनी' (Sunny) चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून लांब असणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. क्षितिज पटवर्धन यांचे भावस्पर्शी बोल असणाऱ्या या गाण्याला सौमील - सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Sunny Movie: 'घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकासाठी'; सनी चित्रपटातील 'रात ही' गाणं रिलीज