एक्स्प्लोर

Sunny Movie: 'घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकासाठी'; सनी चित्रपटातील 'रात ही' गाणं रिलीज

'सनी' (Sunny) चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Sunny Movie: असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील तळमळ असलेले 'सनी' (Sunny) चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून लांब असणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. क्षितिज पटवर्धन यांचे भावस्पर्शी बोल असणाऱ्या या गाण्याला सौमील - सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याला निखिल डिसुझा याचा आवाज लाभला आहे. इरावती कर्णिक लिखित 'सनी' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी केले आहे. 

घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. 'होमसिक' बनलेल्या 'सनी'चा एक भावनिक प्रवास यात दिसत आहे. 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''या गाण्यात आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे. घरी असताना अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात,  ज्या आपल्यासाठी नगण्य असतात. परंतु घरापासून दूर गेल्यावर त्याच गोष्टींचे आपल्या आयुष्यात किती खास महत्व आहे ते कळते. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत आपले घर, कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांची आठवण खूप येते. घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाची कहाणी म्हणजे 'सनी'. हे मनाला भिडणारे गाणे तुम्हाला नक्की आवडेल.'' 

पाहा गाणं:

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

काही दिवसांपूर्वी सनी चित्रपटातील  'नाचणार भाई'  हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. हे गाणंही असाच अनुभव देणारं आहे. असा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकालाच हे गाणं आपल्या 'त्या' दिवसांची आठवण करून देणारं आहे.''

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 23 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget