Sunny Deol :'Gadar 2'च्या रिलीजआधी सनी देओल सुवर्ण मंदिरात नतमस्तक; तारा सिंहच्या लूकनं वेधलं लक्ष!
Sunny Deol At Golden Temple : 'गदर 2'च्या रिलीजआधी सनी देओलने पंजाबच्या सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं आहे.
Sunny Deol At Golden Temple Before Gadar 2 Release : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या या सिनेमाचं तो जोरदार प्रमोशन करत आहे. येत्या 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गदर 2'च्या रिलीजआधी सनी देओलने पंजाबच्या सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं आहे.
'गदर 2' हा सिनेमा बॉक्स बॉक्स ऑफिसवर यशस्वी व्हावा, सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा, यासाठी सनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाच्या रिलीजआधी तो अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पोहोचला आहे. सुवर्णमंदिरातील सनीच्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
सनी देओल पोहोचला सुवर्ण मंदिरात...
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर 2' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने सिनेमावर टीका होत आहे. त्यामुळे सिनेमाच्या रिलीजआधी आशीर्वाद घेण्यासाठी सनी सुवर्ण मंदिरात गेला होता. त्यावेळी त्याने हिरव्या रंगाची पगडी घातली होती. त्याचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Sunny Deol visited the Golden Temple in Amritsar, Punjab earlier today.#gadar2 #sunnydeol pic.twitter.com/CaQc2KyoiJ
— RV Sports & Entertainment (@SportsActive22) August 5, 2023
'गदर 2' कधी होणार रिलीज? (Gadar 2 Release Date)
'गदर 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सिनेमातील गाणी, टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तारा सिंह आणि सकीनाची प्रेमकहानी प्रेक्षकांना 'गदर 2' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अॅक्शनसह नाट्य असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहे. शक्तिमान तलवारने या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. 'गदर : एक प्रेम कथा'च्या आगामी भागात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
संबंधित बातम्या