एक्स्प्लोर

Sunny Deol : सनी देओल पुन्हा बेपत्ता; पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी झळकले पोस्टर

Sunny Deol : पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Sunny Deol Missing Posters in Pathankot : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मोठा चाहतावर्ग आहे. सनी त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत असतो. पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल  हरवला असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर सनीला शोधणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. याआधीदेखील सनी हरवला असल्याचे पोस्टर पठानकोटमध्ये लावण्यात आले आहेत. 

सनी देओल लोकसभा निवडणुकीत गुरदासपूर-पठाणकोट मतदारसंघातून निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर एकदाही ते मतदारसंघात दिसले नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पठाणकोटमध्ये सनीने काहीही विकास केला नसल्याचं नागरिकांचं मत आहे.

सरना बसस्थानकावर लावले सनी बेपत्ता असल्याचे पोस्टर

पठाणकोट जिल्ह्यातील हलका भोआ येथील सरना बस स्थानकावर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. याआधीदेखील सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर पठाणकोट आणि सुजानपूरमध्ये लावण्यात आले आहेत. संसदेत गेल्यानंतर सनी पठाणकोटमध्ये फिरकला नसून तेथील समस्या सोडवल्या नाहीत असं नागरिकांचं मत आहे. त्यामुळे आता पुन्हा पोस्टर लावत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बसने प्रवास करणाऱ्या लोकांनाही सनीने पोस्टर वाटले आहेत. 

एकही समस्या न सोडवल्याचा सनीवर आरोप

संसदेत गेल्यानंतर सनी देओल पुन्हा आपल्या लोकसभेकडे परतला नाही असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सनीला कोणीही तिकीट देऊ नये असा प्रचार पठाणकोटमध्ये करण्यात येत आहे. लोकांना फसवून सनी जिंकला असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 

सनी देओलबद्दल जाणून घ्या... (Who is Sunny Deol)

सनी देओल हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत लोकसभेचे सदस्यदेखील आहेत. सनीने आजवर अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. बेताब या सिनेमाच्या माध्यमातून सनीने 1983 मध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. सनीचे बॉर्डर आणि गदर हे सिनेमे सुपरहिट ठरले होते. गेल्या 25 वर्षांत सनीने वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. त्याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले. अॅक्‍शन हिरो इमेजमध्‍ये अडकून पडलेल्‍या सनीने नंतरच्‍या काळात कॉमेडीपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 

संबंधित बातम्या

Sunny Deol: मुंबईच्या रस्त्यावर नशेत फिरत होता सनी देओल? तारा सिंहनं स्वत:च सांगितलं व्हायरल व्हिडीओ मागील सत्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
Beed: सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा 'तो' निर्णय ठरेल चुकीचा...
...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षाRushikesh Sawant :  Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
Beed: सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा 'तो' निर्णय ठरेल चुकीचा...
...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले...
Tanaji Sawant: 8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून.... तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी
मित्रांसोबत चार्टर्ड प्लेनने बँकॉकला जाण्यासाठी तानाजी सावंतांच्या मुलाने 68 लाख भरले?
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले
Share Market : शेअर बाजारातील घसरण थांबेना,7.68 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्के सुरुच
Embed widget