Gadar 2 : 'गदर 2'च्या ट्रेलरचा धुमाकूळ! 24 तासांत मिळाले लाखो व्ह्यूज!
Gadar 2 Trailer Views : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2'चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Sunny Deol Gadar 2 Movie Trailer Views : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) सध्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर म्हणजेच 26 ऑगस्टला निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 'गदर 2'चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
'गदर 2'च्या ट्रेलरला 24 तासांत 9.9 लाख व्ह्यूज
'गदर 2'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 24 तासांत या सिनेमाला चांगलेच व्ह्यूज मिळाले आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 च्या ट्रेलरला 24 तासांत 9.9 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 'गदर 2' या सिनेमाचा ट्रेलर 24 तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या हिंदी सिनेमांच्या ट्रेलरच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे.
सनी देओलच्या 'गदर 2'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 3.2 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सनी देओल म्हणजेच तारा सिंहचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. सनी देओलसह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्माच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. आता या सिनेमातील गाण्यांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'गदर 2'चं नवं पोस्टर आऊट!
'गदर 2' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
ट्रेलर आणि पोस्टरनंतर चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'गदर 2'च्या नव्या पोस्टरमध्ये सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) दिसत आहेत. सनी देओलच्या 'गदर 2' सिनेमाच्या पोस्टरला चाहत्यांनी पसंती दिली आहे. ब्लॉबबस्टर सिनेमा, पैसा वसुल सिनेमा असणार, सर्वत्र 'गदर 2'च्या ट्रेलरची चर्चा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
SUNNY DEOL - UTKARSH SHARMA: ‘GADAR 2’ NEW POSTER ARRIVES…
— taran adarsh (@taran_adarsh) July 27, 2023
Hamara #Hindustan zindabad thha,
Zindabad hain aur
Zindabad rahega…#Gadar2 #NewPoster featuring #SunnyDeol and #UtkarshSharma… In *cinemas* 11 Aug 2023 [#IndependenceDay weekend].#AnilSharma #ZeeStudios pic.twitter.com/zct138YZYj
'गदर 2'ची रिलीज डेट जाणून घ्या...
सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सनी देओलसह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. उत्कर्ष शर्मा हा सिने-दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. 'गदर 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनिल शर्मा यांनीच सांभाळली आहे.
संबंधित बातम्या