एक्स्प्लोर

Ashok Saraf and Nilu Phule: अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'

Ashok Saraf and Nilu Phule: संकर्षण कऱ्हाडेनं अशोक सराफ आणि निळू फुले यांच्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला.

Ashok Saraf and Nilu Phule Movie: दिवंगत अभिनेते निळू फुले (Nilu Phule) आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी सुरुवातीच्या काळात  अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. त्यांचा चित्रपटांचा एक चाहतावर्ग आहे. दोघांनीही एकत्रित आपल्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशोक सराफ आणि निळू फुले यांनी एकत्र दीड शहाणे, माझा पती करोडपती,  गडबड घोटाळा,  बिन कामाचा नवरा, गल्ली ते दिल्ले, मोसंबी नारंगी,  वाघीण, दिसतं तसं नसतं यांसारख्या  सिनेमांमध्ये काम केलं आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती.  अशोक सराफ यांचा 'आदि अनंत' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये दोन्ही कलाकार व्यस्त आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांनी अलिकडेच एबीपी माझाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडेने अशोक सराफ आणि निळू फुले यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला.

संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला निळू फुले अन् अशोक सराफ यांचा एक किस्सा (Sankarshan Karhade on Ashok Saraf and Nilu Phule)

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, 'अशोक सराफ यांच्याबाबतीत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.  माझं काम चांगलं होईल या अट्टाहास बरोबर, तुझं काम चांगलं व्हावं, ही इच्छा आणि प्रयत्न हे भयंकर शिकण्यासारखं आहे. ते नेहमी उदाहरण देतात की,  निळू फुले आणि अशोक सराफ एकत्र एका प्रोजेक्टवर काम करत होते. त्यांना दिग्दर्शक म्हणाला की, Improvise करा. तेव्हा निळू फुले यांना म्हणाले होते की, 'अरे मगाशी घेतलेलं तू महत्त्वाचं वाक्य खूप छान घेतलं होतं.  ते पुन्हा घेतलं नाहीस?' त्यांनी समोरच्या व्यक्तीचं काम चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न केला'.

'मी परवा त्यांना म्हटलं की,  आपले सिनिअर आपल्याला काय देतात, ते जर आपण आपल्याकडेच ठेवलं तर, आपण कधी सिनिअर होत नाही. फक्त वाढत जातो. या अर्थाने तुम्ही खरंच सिनिअर झाला आहात. त्यांनी मला सिनेमात असं नको, असं कर, असे मार्गदर्शन दिले. वाक्याला अधिक हातवारे न करता डोळ्यांनी अभिनय कर, असं मला त्यांनी सांगितलं होतं.  माझं काम कसं चांगलं  होईल, हे सांगितलं', असं संकर्षण कऱ्हाडे म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
Sayali Sanjeev: सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
Sunny Deol Suryaa Movie : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Advertisement

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
Embed widget