Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज. प्रेक्षकांना लावलं वेड. व्हिडीओ व्हायरल.

Shraddha Kapoors New Song: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'ईठा' (Eetha) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाच्या रिलीजबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोशल मीडियात (Social media) सक्रीय असते. नुकतंच तिने आपल्या नव्या सिनेमाच्या गाण्याची झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. 'ईठा' या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातून श्रद्धा कपूरचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. तिची अदा प्रेक्षकांना नक्कीच घायाळ करणारी आहे. अजय - अतुलने (Ajay Atul) या गाण्याला संगीत दिले असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
'ईठा' सिनेमातील 'जी जी रे जी' गाणं रिलीज, श्रद्धा कपूरच्या अदांनी प्रेक्षक झाले घायाळ (Shraddha Kapoors Eetha Film New Song Ji Ji Re Ji)
'जी जी रे जी' असे गाण्याचे बोल असून, या गाण्यात श्रद्धा कपूर नऊवारी साडीत नृत्य सादर करताना दिसत आहे. या खास गाण्यात श्रद्धा कपूरने पारंपारिक लाल - हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली आहे. प्रेक्षक तिच्या लूकचे विशेष कौतुक करत आहेत. तिची या गाण्यातून पारंपारिक आणि मोहक शैली स्पष्टपणे दिसून येत आहे. या गाण्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीशी थेट जोडलेला एक अद्भूत लोककलेचा स्पर्श आहे. व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभावाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर 'जी जी रे जी' या गाण्याची विशेष चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
'जी जी रे जी' हे जबरदस्त गाणं प्रसिद्ध सिंगर श्रेया घोषाल हिनं गायलं आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते अजय - अतुल या जोडीने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. लक्षवेधी म्यूझिकने या गाण्यात जीव ओतला आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, या गाण्याला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, 'जी जी रे जी' या गाण्यात श्रद्धा कपूर, रणदीप हुड्डा आणि मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याची झलक पाहायला मिळत आहे. 'ईठा' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा 4 डिसेंबर 2026 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















