Stree 2 Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'ची हवा, पहिल्याच दिवशी 'भाईजान'च्या चित्रपटाला पछाडलं
Stree 2 Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी स्त्री 2 ला तुफान प्रतिसाद दिला. इतर दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांचे आव्हान असूनही 'स्त्री 2' ने प्रेक्षकांना आपल्याकडे वळवले आहे.
Stree 2 Box Office Collection Day 1: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'स्त्री 2' (Stree 2) अखेर 15 ऑगस्ट रिलीज झाला आहे. प्रेक्षक या हॉरर-कॉमेडी सिक्वलची आतुरतेने वाट पाहत होते. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी स्त्री 2 ला तुफान प्रतिसाद दिला. इतर दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांचे आव्हान असूनही 'स्त्री 2' ने प्रेक्षकांना आपल्याकडे वळवले आहे. 'स्त्री 2' ने पहिल्या दिवशीच्या कमाईच्याबाबतीत प्रभासचा 'बाहुबली-2' आणि सलमान खानचा 'एक था टायगर' या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
तिकिटबारीवर पहिल्या दिवशी 'स्त्री-2' चा विक्रम
14 ऑगस्टच्या रात्रीच 'स्त्री 2' रिलीज करण्यात आला होता. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी चित्रपटाने 8.35 कोटींची कमाई केली. आता 15 ऑगस्टच्या कलेक्शनमध्ये 'स्त्री 2'ची खरी ओपनिंग झाली. या चित्रपटाने आतापर्यंत 46 कोटींची कमाई केली. यासह, 'स्त्री 2' ने आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 54.35 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती येईपर्यंत यात वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
'एक था टायगर'चा मोडला विक्रम
स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यासह एक था टायगरचा ओपनिंग रेकॉर्डही मोडला आहे. जवळपास 12 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सलमान खानच्या हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. एक था टायगरने पहिल्याच दिवशी 32.93 कोटींची कमाई केली होती. स्त्री-2 ने 46 कोटींची कमाई करत सलमान खानच्या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला.
त्याशिवाय, स्त्री 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. स्वातंत्र्य दिनी रिलीज झालेल्या गदर-2 या चित्रपटाने 55.4 कोटींची कमाई केली होती.
'स्त्री 2' सोबत हे चित्रपट ही झालेत रिलीज...
'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर दिली आहे. चित्रपटगृहांमध्ये जॉन अब्राहमचा 'वेदा', अक्षय कुमारचा 'खेल खेल में', संजय दत्तचा 'डबल स्मार्ट', चियान विक्रमचा 'टांगलन', तेलुगू चित्रपट 'मिस्टर बच्चन' आणि तामिळ चित्रपट 'रघु थाथा' हे देखील रिलीज झाले आहेत.