Stranger Things : 'स्ट्रेंजर थिंग्स'च्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांची पसंती; आता प्रतीक्षा Vol. 2 ची
Stranger Things : 'स्ट्रेंजर थिंग्स'चा चौथा सीझन मात्र नेटफ्लिक्सचा आजवरचा सर्वात धमाकेदार सीझन ठरला आहे.
Stranger Things Season 4 : वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नेटफ्लिक्सवरील 'स्ट्रेंजर थिंग्स' (Stranger Things) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'स्ट्रेंजर थिंग्स'चा चौथा सीझन मात्र नेटफ्लिक्सचा आजवरचा सर्वात धमाकेदार सीझन ठरला आहे. हा सीझन हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू या भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
781.04+ मिलियन व्ह्यूज असलेली पहिली वेबसीरिज
'स्ट्रेंजर थिंग्स'च्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या वेबसीरिजने अनेक रेकॉर्ड केले आहेत. या वेबसीरिजला 781.04 पेक्षा अधिक व्हूयूज मिळाले आहेत. स्पॅनिश वेब सिरीज 'मनी हाईस्ट' प्रमाणेच 'स्ट्रेंजर थिंग्स'चा चौथा सीझनदेखील दोन भागांत विभागला आहे. आता 1 जुलैला येणाऱ्या vol 2 च्या शेवटच्या दोन एपिसोडकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'स्ट्रेंजर थिंग्स'चा चौथा सीझन कसा आहे?
लहान वयात मुलं आपलं स्वतःचं स्वतंत्र विश्व बनवतात. त्यात नायक, खलनायक अशी पात्रही असतात अन घटनाही. सगळं काही त्यांच्या काल्पनिक जगात सुरू असताना जर ते सर्व खरोखरच घडू लागलं तर? नेटफ्लिक्सवर अशाच एका विषयावर 'स्ट्रेंजर थिंग्स' ही वेबसीरिज 2016 साली प्रदर्शित झाली.
शाळेत जाणाऱ्या चार मुलांच्या एका ग्रुपची ही गोष्ट. त्यांच्या खेळण्यात, कथेत जे खलनायक, राक्षस वगैरे पात्र असतात ते खऱ्या जगात अवतरतात. पण त्याला विज्ञानाची किनार आहे. मग हा ग्रुप त्या परिस्थितीशी सामना करत असताना हळूहळू अनेक पात्र या परिघात येत जातात. यातील मुख्य कथानक, उपकथानक, पात्र आणि एकूण वातावरण निर्मिती पाहता ही मालिका जगभरात लोकप्रिय झाली. एकामागून एक असे तीन सिजन येत गेले आणि प्रेक्षकांनी ते डोक्यावर घेतले.
त्यातच अलीकडे चौथा सीझन आला. या सीझनने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. चौथा सीझन दोन vol मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. चौथ्या सीझनमधील एकूण 9 भागांपैकी 7 vol1 मध्ये प्रदर्शित झाले आहेत. तर उर्वरित दोन 1 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या प्रेक्षक या दोन भागांची प्रतीक्षा करत आहेत.
मुख्य घटनाक्रम सुरू होतो हॉकिंन्स या छोट्याशा शहरातील एका पॉवर स्टेशनमध्ये घडलेल्या अपघातापासून. जी एक गुप्त विज्ञानशाळा आहे. जिथे मानवाला सुपरमानव म्हणून विकसित केलं जातं. त्याच विज्ञानशाळेत एल अर्थात इलेव्हन या मुख्य पात्राचा उगम होतो. ही छोटीशी मुलगी नकळतपणे समांतर विश्वाचा दरवाजा उघडते आणि शहरात एकाहून एक भयानक संकटे येऊ लागतात. या समांतर विश्वातील ज्याला अपसाईड डाउन म्हटलं गेलं आहे, राक्षस मानवी जीवन संपवू पाहत आहेत आणि चार मुलांचा ग्रुप एल च्या मदतीने ते सगळं रोखू पाहत आहेत. मग या संघर्षात हॉकिंसचे शेरीफ जिम होपर त्यांना मदत करतात आणि हळूहळू ते कथेतील मुख्य पात्रांपैकी एक होतात. मग अनेकजण या संघर्षात जोडले जातात आणि हा श्वेत-अश्वेत संघर्ष आणखीनच टोकाचा होत जातो. कथेत फक्त मानव विरुद्ध राक्षस संघर्ष आहे असं नाही तर मानवी मन, लहान मुलांचं भावविश्व असे अनेक पदर या कथानकात आहेत.
तिसऱ्या सीझनच्या शेवटला हा संघर्ष संपला आहे असं वाटत होतं. शिवाय जिम हॉपर यांचा मृत्यू. ग्रुपमध्ये ताटातूट अशा घटनांनी तिसऱ्या सीझनची समाप्ती झाली होती. पण चौथा सीझन सुरू झाला आणि कथेची व्याप्ती अजूनच वाढत गेली. इलेव्हनचा जन्म, समांतर विश्वाचं उगमस्थान, जिम हॉपर यांचं जीवंत असणं आणि मित्रांमधील ताटातूट या सगळ्या गोष्टींमुळे विषय अधिक स्पष्टपणे समोर आला आहे.
vol2 मात्र फार महत्वाचा आहे. ज्यामध्ये एका मोठ्या शक्तीशी मानवी संघर्ष तर आहेच पण इलेव्हनचा स्वतःशी असलेला संघर्ष, जिम हॉपर यांचं कैदेतून सुटून सर्वांसमोर येणं, चारही मित्रांचं पुन्हा एकत्र येणं, विल बायर्सच्या सेक्शयुएलिटी बद्दलचे संशय, समांतर विश्वाशी संघर्ष असे अनेक सस्पेन्स अजून कायम आहेत आणि त्यामुळेच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या