एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कबीर सिंह'चं स्क्रीनिंग थांबवा, डॉक्टरांचं आरोग्यमंत्री, सेन्सॉर बोर्डाला पत्र
बॉक्स ऑफिसवर कबीर सिंह सिनेमाची जोरदार कमाई सुरु आहे. पहिल्या चार दिवसात सिनेमाने 88.37 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या कबीर सिंह चित्रपटाचं स्क्रीनिंग थांबवा, अशी मागणी करण्यात आली आहे. या सिनेमामुळे डॉक्टरी पेशाची आणि डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप डॉ. प्रदीप गाडगे यांनी केली आहे.
डॉ. प्रदीप गाडगे यांनी या संदर्भात राज्य आणि केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती प्रसारण मंत्री तसंच सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून कबीर सिंह सिनेमाचं स्क्रीनिंग थांबवण्याची मागणी केली आहे.
REVIEW | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट
सिनेमात शाहिद कपूरने कबीर सिंह नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. कबीर सिंह हा व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याचं डॉक्टरी पेशावर जीवापाड प्रेम आहे. मात्र सिनेमात अनेक दृश्यांमध्ये तो दारु पिताना तसंच अंमली पदार्थांचं सेवन करताना दाखवलं आहे. यावरच डॉ. प्रदीप गाडगे यांनी आक्षेप घेत स्क्रीनिंग थांबवण्याची मागणी केली आहे.
बॉक्स ऑफिसवर कबीर सिंह सिनेमाची जोरदार कमाई सुरु आहे. पहिल्या चार दिवसात सिनेमाने 88.37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल (24 जून) या सिनेमाने 17.50 कोटींची तर पहिल्या दिवशी 20.21 कोटींची कमाई केली होती. एकंदरच चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
सोलापूर
Advertisement