SSR Birthday: सुशांतच्या जन्मदिनी कंगनाने समजावली त्याच्या मृत्यूची क्रोनोलॉजी
SSR Birthday: आज अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) जन्मदिवस आहे. त्याच्या मृत्यूला जवळपास आठ महिने होत आले तरी त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली याचा तपास सुरु आहे. आता कंगनाने (Kangana Ranaut) त्याच्या मृत्यूची क्रोनोलॉजी (chronology) समजावली आहे.
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिवस आहे. गेल्या वर्षी 14 जून रोजी तो मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत सापडला होता. त्याने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला हे अजून उघड झालं नाही. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. त्याच्या जन्मदिवशी कंगनाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काही ट्वीट करत त्याच्या मृत्यूची क्रोनोलॉजी समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
Dear Sushant, movie mafia banned you bullied you and harassed you, many times on social media you aksed for help and I regret not being there for you. I wish I didn’t assume you are strong enough to handle mafia torture on your own. I wish ... Happy Birthday dear one #SushantDay pic.twitter.com/xqgq2PBi0Y
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 21, 2021
कंगनाने या संबंधी चार गोष्टींकडे सुशांतच्या चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये तिने म्हटलं आहे की, "यशराज फिल्मने सुशातंवर बंदी आणली होती हे आपण विसरायला नको. करण जोहरने त्याला मोठी स्वप्ने दाखवली आणि नंतर त्याचे चित्रपट रीलीज होऊ दिले नाहीत. नंतर करण जोहरने सांगितले की सुशांत एक फ्लॉप अभिनेता होता."
Never forget Sushant spoke about YashRaj films banning him,He also spoke about Karan Johar showing him big dreams and dumping his film on streaming, then crying to the whole world that Sushant is a flop actor. Never forget all Mahesh Bhatt children are depressed yet he told(cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 21, 2021
त्यानंतर कंगना म्हणते की, "आपल्या हिंमतीवर अभिनेता बनलेल्या सुशांतने आदित्य चोप्राच्या गटात राहण्यात नकार दिला. त्याच वेळी आदित्य चोप्राने ठरवले होते की सुशांतचे करिअर संपवायचे. करण जोहर आणि आदित्य चोप्राचे नेपोटिजमवरचे प्रेम सर्वांना माहित आहे."
I have said enough about this but still it isn’t enough. Chronology of Sushant murder. 1) Fall out with Aaditya Chopra because self made Sushant refused to be bound by their evil capitalists contracts.Chopra promised to destroy him. 2) KJO and Chopra bound by Nepotism love (cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 21, 2021
कंगना आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हणते की, "बॉलिवूडमधील माफिया लोकांनी सुशांतची बलात्कारी आणि ड्रग अॅडिक्ट अशी बदनामी करुन त्याच्याविरोधात मोहिम सुरु केली. त्याचवेळी महेश भट्टने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला आणि त्याला सांगितले की तो परवीन बाबीच्या मार्गावर चालतोय. भट्ट साहेब, जर सगळेच उदास लोक परवीन बाबीच्या मार्गावर चालू लागले तर तुमची मुलगी शाहीन तर डिप्रेशनची ब्रँन्ड अॅम्बेसिडर असायला हवी."
4) Just then Mahesh Bhatt entred his life and started to psyche him that he is bound to go Parveen Babi way because he was depressed, Bhatt saab if all depressed people go Babi way then your daughter Shaheen should also go that way she is official brand ambassador of depression.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 21, 2021
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील 'मीडिया ट्रायल'वर हायकोर्टाचे ताशेरे
कंगना पुढे म्हणते की, "आता सुशांतचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणे आवश्यक आहे. तूम्ही चांगले नाही असे कुणालाही सांगू देऊ नका, स्वत:पेक्षा जास्त कुणावरही भरोसा करु नका. जे लोक सांगतात की ड्रग्ज हेच सोल्यूशन आहे त्यांना जवळ करु नका."
Above everything celebrate Sushant day as a celebration of life, don’t let anyone tell you that you arnt good enough, don’t trust anyone more than yourself, leave people who tell you drugs are the solution and suck you dry financially and emotionally, celebrate #SushantDay
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 21, 2021
Kangana Ranaut | कंगनाची टीकाकारांना धमकी, म्हणाली- लिबरल लोकांचं जीवन जगणं कठीण करेन.