एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Birth Anniversary | कुटुंबीय, चाहत्यांकडून सुशांतच्या आठवणींना उजाळा, सीबीआय अद्यापही निष्कर्षाविना!

Sushant Singh Rajput Birth Anniversary : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज जयंती आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर चाहते त्याच्याबाबतच्या आपल्या आठवणी शेअर करत आहेत. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. परंतु सीबीआय अद्यापही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज जयंती आहे. या निमित्ताने चाहते त्याचं स्मरण करत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याच्याबाबतच्या आपल्या आठवणी शेअर करत आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्र्यामधील राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. सुशांतसारख्या उत्तम अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण देशभर स्तब्ध झाला होता, विशेषत: त्याचे चाहते अतिशय निराश झाले होते.

सीबीआय अद्यापही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही सुशांतने आत्महत्या केली नसून ही हत्या आहे, असा आरोप सुशांतचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी केला होता. यानंतर देशभरातून सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी होऊ लागली. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु कालांतराने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. परंतु अनेक महिन्यानंतरही सीबीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सीबीआयने म्हटलं आहे की सुशांत सिंह प्रकरणात सर्व पैलू विचारात घेतले जात आहे. सध्या कोणत्याही शक्यतेचा इन्कार केला जाऊ शकत नाही.

सुशांतच्या मृत्यूनंतर कोणकोणते मुद्दे चर्तेत? सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रोफेशनल लाईफशिवाय रिया चक्रवर्तीसोबतचे प्रेमसंबंधही फार चर्चेत होते. लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या सुशांत आणि रियाशी संबंधित प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनली होती. त्याच्या मृत्यूनंतर 'नेपोटिझम'चा मुद्दाही समोर आला होता. गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीच्या मते, सुशांत डिप्रेशनमध्ये होता. यानंतर या प्रकरण ड्रग अँगलही समोर आला. या प्रकरणी रिया चक्रवर्तीने एक महिना तुरंगात राहावं लागलं होतं.

बहिणीचं चाहत्यांना आवाहन दुसरीकडे सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने आपल्या भावाच्या चाहत्यांना विशेष आवाहन केलं आहे. सुशांत जगलेल्या आयुष्याचा सोहळा करण्याचे आणि 21 जानेवारी या त्याच्या जन्मदिनी प्रेम वाटून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तिने लिहिलं आहे की, "आपल्याला 21 जानेवारीला सुशांतचा जन्मदिवस कसा साजरा करायला हवा....कोणता सल्ला? #SushantBirthdayCelebration."

तिने पुढे लिहिलं आहे की, "त्याच्या गाण्यांवर डान्स करुन चाहत्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला आवडेल. त्याच्या आयुष्याचा जल्लोष साजरा करुया आणि प्रेम तसंच आनंद परवण्यात मदत करा."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वडिलांचं छत्र हरपलं, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शुभम जाधवची हळवी पोस्ट
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वडिलांचं छत्र हरपलं, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शुभम जाधवची हळवी पोस्ट
सलीम खान यांची प्रकृती नाजूक, तब्येतीबाबत डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया; मेडिकल बुलेटीन देणार
सलीम खान यांची प्रकृती नाजूक, तब्येतीबाबत डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया; मेडिकल बुलेटीन देणार
फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांना भेटला मि. इंडिया; अनिल कपूर, रिचा चड्डासह बॉलिवूड कलाकारांशी आपुलकीचा संवाद, काय चर्चा?
फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांना भेटला मि. इंडिया; अनिल कपूर, रिचा चड्डासह बॉलिवूड कलाकारांशी आपुलकीचा संवाद, काय चर्चा?
ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचं दु:खद निधन; घरातच घेतला अखेरचा श्वास
ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचं दु:खद निधन; घरातच घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget