Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ
Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2' ही कोरियन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
![Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ Squid Game 2 Teaser Out Squid Game Season 2 Teaser Trailer Reveals Cast know details Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/18/f6d68c404114b5d293476b3e6ca68cb31687083631185254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे.
'स्क्विड गेम 2'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीरिजचा टीझर शेअर करत नेटकऱ्यांनी या रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. या नव्या सीझनमध्ये काही नवीन कलाकारदेखील झळकणार आहेत. 'स्क्विड गेम 2' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सने 'स्क्विड गेम 2' या वेबसीरिजचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,रेड लाईट...ग्रीन लाईट!'स्क्विड गेम 2' अधिकृतरित्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. आता दुसऱ्या सीझनची कथा जाणून घेण्यास आणि कलाकारांचा अभिनय पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
'स्क्विड गेम 2'मध्ये काही जुन्या कलाकारांसोहत नवीन चेहरेदेखील झळकणार आहेत. यात कोरियन अभिनेता आणि गायक यिम सी-वान, कांग हा-नेउल, पार्क सुंग-हून आणि यांग डोंग-जौनचा समावेश आहे. हे कलाकार या सीरिजमध्ये कोणत्या भूमिकेत झळकणार याची आता चाहत्यांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
'स्क्विड गेम' ही नऊ भागांची वेब सीरिज आहे. कर्जबाराजी मंडळींच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. लोकांना पैशाचे आमिश दाखवत खेळात सहभागी करुन घेतले जाते. त्यानंतर त्या सर्व लोकांना मारण्यात येते. हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला 38.7 मिलिअन डॉलर मिळतात. आता या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'स्क्विड गेम' ही 2021मध्ये प्रदर्शित झालेली कोरियन सीरिज आहे. त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी ती एक होती. Squid Game ही सिरीज 111 दशलक्ष वहयूजसह सर्वाधिक पाहिलेली Netflix सिरीज बनली. ही सिरीज Netflix मधल्या 94 देशांपैकी पहिल्या 10 मध्ये होती. या सिरीजच्या शेवटी असेही सांगण्यात आले होते की, तिच्या पुढील सीझनचा विचार करण्यात आला आहे. परंतु, आता प्रचंड लोकप्रियता पाहता निर्मात्यांना ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणायची आहे.
संबंधित बातम्या
Squid Game 2 : काय म्हणता!! ‘स्क्विड गेम’चा सीझन 2 येणार? नेटफ्लिक्सच्या CEOकडून मोठी अपडेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)