एक्स्प्लोर
Advertisement
दक्षिण मुंबईतील ताडदेव देशातील सर्वात महागडा रहिवासी परिसर!
मुंबईतील मलबार हिल किंवा वांद्रे नाही तर ताडदेव हा देशातील सर्वात महागडा रहिवासी परिसर आहे. इथे घर घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला एका चौरस फुटासाठी तब्बल 55 हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील ताडदेव हा देशातील सर्वात महागडा रहिवासी परिसर आहे. दक्षिण मुंबईतील या परिसरात एका चौरस फुटाची किंमत तब्बल 56 हजार रुपये आहे. संपत्तीसंबंध सल्ला देणारी कंपनी एनरॉकने ही माहिती दिली आहे.
एनरॉकने देशातील दहा सर्वात महागड्या रहिवासी परिसरांची यादी तयार केली आहे. कंपनीचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, "56 हजार 200 रुपये प्रति चौरस फूट दराने दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसर देशात सर्वात महागडा ठरला आहे."
एनरॉकनुसार, ताडदेवनंतर वरळी आणि महालक्ष्मी सर्वात महागडे परिसर आहेत. वरळीमध्ये घरांच्या सरासरी किंमतीचा दर अनुक्रमे 41, 500 रुपये आणि 40 हजार रुपये प्रति चौरस फूट आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर आठव्या स्थानावर
याशिवाय महागड्या रहिवासी परिसरांमध्ये महाराष्ट्रातील आणखी एका शहराचा समावेश आहे. पुण्यात कोरेगाव पार्क या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. कोरेगाव पार्क हा पुण्यातील उच्चभ्रू परिसरांपैकी एक आहे. सध्या इथे एका चौरस फुटासाठी 12,500 रुपये मोजावे लागत आहेत.
चेन्नईतील ही शहरं महागडी
या यादीत चेन्नईतील काही परिसरही आहेत. चेन्नईतील नुंगमबक्कम हा परिसर 18 हजार रुपये प्रति चौरस फुटासह चौथ्या, एगमोर 15,100 रुपये प्रति चौरस फुटासह पाचव्या तर अन्ना नगर 13 हजार रुपये प्रति चौरस फुटासह सातव्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा करोलबाग 13,500 रुपये प्रति चौरस फूट दरासह सहाव्या क्रमांकावर आहे.
तर हरियाणाच्या गुरुग्राममधील गोल्फ कोर्स हा परिसर या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. इथे एका चौरस फुटाची किंमत 12,500 रुपये आहे. तसंच कोलकातामधील अलीपोरे दहाव्या स्थानावर आहे. इथे एका चौरस फुटाची किंमत 11,800 रुपये आहे.
देशातील दहा महागडे रहिवासी परिसर
- ताडदेव (मुंबई)
- वरळी (मुंबई)
- महालक्ष्मी (मुंबई)
- नुंगमबक्कम (चेन्नई)
- एगमोर (चेन्नई)
- करोलबाग (दिल्ली)
- अन्ना नगर (चेन्नई)
- कोरेगाव पार्क (पुणे)
- गोल्फ कोर्स (गुरुग्राम, हरियाणा)
- अलीपोरे (कोलकाता)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement