South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
South Movie Clash 2024 : मे (May) महिन्याच्या शेवटी एक दोन नव्हे तर सहा दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे या महिन्यात बॉलिवूडला मोठा फटका बसू शकतो.
South Movie Clash 2024 : कोरोनानंतर बॉक्स ऑफिसवर आपला चित्रपट (Movies) चालवण्यासाठी निर्मात्यांना विविध प्रयत्न करावे लागत आहेत. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर 'केजीएफ 2' (KGF 2) आणि 'आरआरआर' (RRR) हे चित्रपट प्रदर्शित झाले. सरतं वर्ष 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटांनी गाजवलं. आता 2024 कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वर्षात 'पुष्पा 2' सारखे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट इतिहास रचेल असे म्हटले जात आहे. मे 2024 च्या शेवटी या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळू शकते.
दुसरीकडे मे 2024 च्या शेवटी एकसाथ 6 दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) रिलीज होऊ शकतात. सहा बिग बजेट चित्रपट आमने-सामने येणार आहेत. या महाक्लॅशची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सहा चित्रपटांमध्ये अनेक बड्या सिनेमांची नावे आहेत.
गँग्स ऑफ गोदावरी (Gangs of Godavari)
मे 2024 च्या शेवटी रिलीज होणाऱ्या बड्या चित्रपटांमध्ये 'गँग्स ऑफ गोदावरी' या चित्रपटाचा समावेश आहे. विश्वाक सेन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट 17 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 31 मे 2024 रोजी प्रदर्शित होईल.
सत्यभामा (Satyabhama)
काजल अग्रवाल तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता 'सत्यभामा' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या काळानंतर ती कमबॅक करणार आहे. या चित्रपटात ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नवीन चंद्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 31 मे 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
हारोम हारा (Harom Hara)
'हारोम हारा' हा पॅन इंडिया चित्रपट आहे. या चित्रपटात सुधीर बाबू मुख्य भूमिकेत होता. 31 मे 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात मालविका शर्मा मुख्य भूमिकेत होती. 31 मेला 'गम गम गणेशा'देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटात आनंद देवरकोंडा आहे. हा विनोदी, क्राइम चित्रपट आहे.
भजे वायु वेगम (Bhaje Vaayu Vegam)
कार्तिकेयचा 'भजे वायु वेगम' हा चित्रपट 31 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अॅक्शन, थ्रिलर चित्रपट आहे. तेलुगू प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
म्यूझिक शॉप मूर्ती (Music Shop Murthy)
म्यूझिक शॉप मूर्ती या चित्रपटात चांदनी चौधरी आहे. हा विनोदी चित्रपट आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉलिवूडला फटका
मे महिन्याच्या शेवटी बॉलिवूडचा कोणताही खास चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मनोज बाजपेयी यांच्या भैया जी या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटात मनोजचा राऊडी अवतार पाहायला मिळणार आहे. 24 मे 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. जॉन अब्राहमचा तहरानदेखील 24 मेरोजी प्रदर्शित होणार आहे. तर अनिल कपूर आणि दिव्या खोसला कुमार अभिनीत 'सावी:ए ब्लडी हाऊस वाईफ' आणि अनुपम खेरचा 'छोटा भीम अॅन्ड द क्यूर्स ऑफ दयमान' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉलिवूडला फटका बसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या