![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Fateeh teaser launch : अभिनयासह दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही सोनू सूद करणार का 'फतेह'? चित्रपटाचा टीझर रिलीज
Fateeh teaser launch : सोनी सूदने आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं असून त्याच्या फतेह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Fateeh teaser launch : अभिनयासह दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही सोनू सूद करणार का 'फतेह'? चित्रपटाचा टीझर रिलीज Sonu Sood directed Fateeh teaser launch Jacqueline Fernandez will be seen in the lead role detail marathi news Fateeh teaser launch : अभिनयासह दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही सोनू सूद करणार का 'फतेह'? चित्रपटाचा टीझर रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/ae38730b63549f1d6d2560d74d8751c01710580694859720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fateeh teaser launch : सध्या बॉलीवूडमध्ये अनेक नव्या सिनेमांची एन्ट्री सिनेमागृहात होतेय. त्यातच आता आणखी एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) दिग्दर्शित फतेह (Fateeh) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. 'फतेह'मध्ये सोनूने अभिनेता-दिग्दर्शक-लेखक-निर्माता अशी चौपट भूमिका साकारली आहे.
या टीझरमध्ये सायबर गुन्ह्यांच्या एका रोमांचकारी जगाची झलक दाखवण्यात आली आहे.जो एक रोमांचक सिनेमॅटिक देऊन जाणार आहे. त्यामुळे या सिनेमाकडून सध्या प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. चित्रपटाची टॅगलाईन 'नेव्हर अंडरएस्टीमेट अ नोबडी' अशी आहे. दरम्यान ही या सिनेमाची एक वेगळी गोष्ट असून ती सोनू सूदच्या वैयक्तिक प्रवासालाही खऱ्या अर्थाने लागू होत असल्याचं म्हटलं जातंय. फतेहचा टीझर सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केलाय.
जॅकलिन फर्नांडिस दिसणार मुख्य भूमिकेत
फतेह या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने सोनू सूदही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. याआधी सोनू सूदने या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. ज्याला प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद देखील दिला होता. त्यातच आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
View this post on Instagram
'फतेह'मध्ये सोनूने अभिनेता-दिग्दर्शक-लेखक-निर्माता अशी चौपट भूमिका साकारली आहे. या चित्रपटात भारतीय आणि हॉलीवूड क्रूचे उत्कृष्ट मिश्रण आहे आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले ॲक्शन सीक्वेन्स यात बघायला मिळणार आहेत. सोनाली सूद शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, हा चित्रपट सायबर क्राइमच्या गुंतागुंत आणि आव्हानांभोवती फिरतो.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)