एक्स्प्लोर

Songya : स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' प्रदर्शनासाठी सज्ज; ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत

Songya Marathi Movie : 'सोंग्या' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Songya Marathi Movie : 'मुलगी शिकली प्रगती झाली' अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या माध्यमातून अगदी हलक्या-फुलक्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिलिंद इनामदार दिग्दर्शित 'सोंग्या' (Songya) हा सिनेमा 15 डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.

स्त्रीशक्तीचा जागर करणारा ‘सोंग्या’ चित्रपटगृहात

दिपक यादव यांनी लिहिलेली 'सोंग्या' या सिनेमाची संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही  प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर करत नाहीच पण ती अशा रूढींविरोधात आवाज उठवते. आपल्या पारंपरिक भारुडांच्या माध्यमातून जनजागृती करणारी प्रातिनिधिक स्वरूपातील शुभ्रा हे पात्र असंख्य मुलींचे बळी जाण्यापासून वाचवू शकते अशी निर्माते-दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांना आशा आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने विविध गाण्यांची 'सोंग्या' मध्ये रेलचेल असून 'दादा झाले अध्यक्ष, त्यांचं दिल्लीवर लक्ष' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. मनोरंजनासोबतच मौलिक संदेश देणारा 'सोंग्या' सर्वांनी आवर्जून पहावा असाच झालाय.

ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत!

'सोंग्या' सिनेमात मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' हा सिनेमा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत जळजळीत अंजन घालतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 'सोंग्या' या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली. एका लढवय्या मुलीची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Songya Official Trailer: "एका लढवय्या मुलीची कहाणी"; सोंग्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget