Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: कर्लिस हॉटेल सील, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितलं की, कर्लिस रेस्टॉरंट सील करण्यात आले आहे.
Sonali Phogat : भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता सोनाली फोगाट हत्याप्रकरणाबाबत (Sonali Phogat Murder Case) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी मीडियासोबत संवाद साधताना सांगितलं की, कर्लिस रेस्टॉरंट सील करण्यात आले आहे. कर्लिस या रेस्टॉरंटमध्येच सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली फोगटला ड्रग्जचा ओव्हरडोज दिला.
सोनाली फोगट हत्याप्रकरणी सीबीआयनं तपास करावा, अशी मागणी सोनाली यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. त्यावर प्रमोद सावंत म्हणाले की, आम्ही हा तपास शेवटपर्यंत करणार आहोत आणि तपास अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सुरू आहे. तसेच प्रमोद सावंत यांनी हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या वक्तव्याला उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, आमच्या डीजीपीने लेखी उत्तर दिले असून हैदराबाद पोलिसांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य मागितले नाही.
काय म्हणाले हैदराबादचे पोलीस आयुक्त?
हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी दावा केला आहे की,तपासादरम्यान त्यांना गोव्यातील प्रितिश नारायण आणि एडविन नावाच्या दोन ड्रग्ज तस्करांची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या टीमने गोव्यात जाऊन प्रितिशला पकडले पण ते एडविनला पकडू शकले नाही. तसेच हैदराबाद पोलिसांनी अंमली पदार्थाशी संबंधित तपासात गोवा पोलिसांची मदत घेतली पण गोवा पोलिसांनी सहकार्य केले नाही.
आरोपीला जामीन
गोव्याच्या एनडीपीएस कोर्टाने कर्लिस रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्सला जामीन मंजूर केला. एडविनला 30 हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि जामिनासाठी 15-15 हजार रुपयांचे दोन जामीन द्यावे लागतील.
सीबीआय चौकशीची मागणी करणार!
सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे नातेवाईक विकास सिंघमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले होते की, त्यांनी सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीश यूयू ललित यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, 'गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत.’
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Sonali Phogat Case : ‘मी खूप अस्वस्थ झालेय’, सोनाली फोगाट यांनी दिग्दर्शकाला कॉल करून सांगितली होती आपली व्यथा!
- Sonali Phogat Case : ‘सोनालीला गोव्यात आणणं आमच्या प्लॅनचाच भाग’, आरोपी सुधीर सांगवानने दिली कबुली!
- Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड