एक्स्प्लोर

Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड

Sonali Phogat : सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला, अशी माहिती सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला दिली आहे.

Sonali Phogat : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. मात्र याच दरम्यान आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला खळबळजनक माहिती दिली आहे. सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला. यासाठी त्याने तांत्रिकाला अनेकवेळा फार्म हाऊसवर बोलावले होते, असा दावा ऋषभ बेनिवालने केला आहे.

याप्रकरणी सोनाली फोगटचे पीए सुधीर सांगवान याच्यासह पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. सुधीर सांगवान व्यतिरिक्त कथित ड्रग्ज तस्कर आणि गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. 

ऋषभ बेनिवाल यांनी सुधीर सांगवान याच्यावर आणखी आरोप केले आहेत. ऋषभ यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार,  "सोनालीची मुलगी यशोधरा हिलाही सुधीरकडून धोका आहे, माझ्या उपस्थितीत त्याने सोनालीशी गैरवर्तन केले. त्याच्याकडे असे काहीतरी होते ज्याने सोनाली तो काय म्हणतोय ते ऐकत असे. मी सोनालीला त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डबद्दल सांगितले होते.     रोहतकमध्ये सुधीर सांगवानची फौजदारी फाइल आहे. अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली सुधीरने शेतकऱ्यांची करोडो रुपयांची फसवणूक केली. 

सुधीर सांगवानच्या कथित फसवणुकीचा बळी झालेला शेतकरी अमित डांगी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "सुधीर सांगवान सोनाली फोगटसह शेतकऱ्यांकडे यायचा. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसोबत सोनाली फोगटचा व्हिडीओही उपलब्ध आहे. 

टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रियॅलिटी शो 'बिग बॉस'मुळेही (Big Boss) सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना 23 ऑगस्ट रोजी मृत घोषित केलं होतं.  परंतु, त्यांच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे. सोनाली यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे करण्यात येत असून तिची हत्या केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आतपर्यंत चार जणांना अटक केली असून पुढील तपास देखील वेगाने सुरू आहे. या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. 

सोनाली यांच्या शवविच्छेदनातच्या अहवालामध्ये आता असं म्हटलं गेलं आहे की, त्यांना जबरदस्तीनं ड्रग्स देण्यात आलं होतं. सुधीर याने आपण सोनालीला जबरदस्ती ड्रग्ज दिलं होतं याची कबुली देखील पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे ही हत्या का करण्यात आली आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Barve on CJP: 'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Barve on CJP: 'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
Embed widget