एक्स्प्लोर

Mylek Marathi Movie : आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक'; मराठमोळ्या स्टारकिडचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

Sonali Khare Daughter Movie : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली खरेचा 'मायलेक' (Mylek) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mylek Marathi Movie : मराठी मनोरंजनसृष्टीत विविध धाटणीचे सिनेमे (Marathi Movies) प्रदर्शित होत आहे. आता बॉलिवूडप्रमाणे मराळमोळे स्टारकिडदेखील रुपेरी पजद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली खरेचा (Sonali Khare) 'मायलेक' (Mylek) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिची लेकदेखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' येणार 19 एप्रिलला 

आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या'मायलेक' (Mylek) सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या  भेटीला आले असून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी 'माय लेकी'ची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Blooming Lotus Productions (@bloominglotusproductions)

प्रियांका तन्वरने 'मायलेक' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत. 

'मायलेक'मध्ये काय पाहायला मिळणार?

आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. 

आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा 'मायलेक'

'मायलेक' सिनेमाबद्दल बोलताना निर्माती सोनाली खरे म्हणाले,"आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आईमुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले".

दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणाल्या,'मायलेक' या सिनेमाचा विषय खूप संवेदनशील आहे. विशेषतः मुली जेव्हा वयात येतात. त्यावेळी आई आणि मुलीचे नाते खूपच नाजूक वळणावर असते. यात एकतर मुलगी आणि आई मैत्रिणी तरी होतात किंवा मग त्यांच्यात नकळत दुरावा तरी निर्माण होतो. मग अशा वेळी दोघीनींही एकमेकींना समजून घेणे गरजेचे आहे. विषय जरी नाजूक असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे".

संबंधित बातम्या

Mylek film : मातृदिनाच्या निमित्ताने ‘मायलेक’ चित्रपटाची घोषणा; सोनाली खरे निर्मिती क्षेत्रात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 01 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report | Prashant Koratkar | इंद्रजीत सावंतांना धमकी, तीन दिवसांपासून गुंगारा, कोरटकर आहे कुठे?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 pm 28 February 2025Special Report | Indian Girl Accident In America | तिची झुंज, कुटुंबीयांचा संघर्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Embed widget