![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sonakshi Sinha : झहीरनं शेअर केला व्हिडीओ; सोनाक्षीला म्हणाला, 'आय लव्ह यू'
सोनाक्षीच्या आणि झहीर इक्बालच्या (Zaheer Iqbal) अफेअरबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.
![Sonakshi Sinha : झहीरनं शेअर केला व्हिडीओ; सोनाक्षीला म्हणाला, 'आय लव्ह यू' sonakshi sinha and zaheer iqbal confirm their relationship on social media Sonakshi Sinha : झहीरनं शेअर केला व्हिडीओ; सोनाक्षीला म्हणाला, 'आय लव्ह यू'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/2e6969d583f4e776fccd9267ea11a3b0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sonakshi Sinha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीनं तिच्या रिंगचा फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे सोनाक्षीचा साखरपुडा पार पडला आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. सोनाक्षीच्या आणि झहीर इक्बालच्या (Zaheer Iqbal) अफेअरबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता नुकताच झहीरनं एक व्हिडीओ शेअर करुन सोनाक्षीसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.
झहीरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा ही फ्लॅइटमध्ये बर्गर खाताना दिसत आहे. या व्हिडीओला झहीरनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. हीर इक्बालनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यू. तुला असंच प्रेम आणि आनंद कायम मिळत राहो. '
View this post on Instagram
झहीरनं शेअर केलेल्या या व्हिडीओला सोनाक्षीनं रिप्लाय दिला, 'धन्यवाद, लव्ह यू' जहीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी या कलाकारांनी जहीरनं शेअर केलेल्या व्हिडीओला लाइक केलं आहे. सोनाक्षीनं काही दिवसांपूर्वी एका नवा ब्यूटी ब्रँडला लाँच केलं.
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)