Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठी दाखवत म्हणाली, 'माझ्यासाठी मोठा दिवस'
Sonakshi Sinha : फोटोला सोनाक्षीनं (Sonakshi Sinha) दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

Sonakshi Sinha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाक्षीनं नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
सोनाक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी उत्सुक आहे.' सोनाक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका व्यक्तीच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसत आहे. हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. सोनाक्षीच्या फोटोला पुनित मल्होत्रा, अभिनेत्री कुबरा सैत आणि शिबानी दांडेकर यांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...























