Singham Again : अर्जून कपूर बॉक्स ऑफिसवर लागोपाठ फ्लॉप, तरीही रोहित शेट्टीने सिंघम अगेनसाठी निवडलं; कारण जाणून घ्या...
Singham Again Movie : रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
Singham Again Movie : बॉलिवुडमधील आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण स्टारर सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर, दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा विलन लूक सर्वांनाच आवडला आहे. पण, सगन फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अर्जुन कपूरला सिंघम अगेनमध्ये का घेतलं असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
बॉलिवूडमध्ये फ्लॉप तरीही अर्जून कपूरची निवड का केली?
आता सिंघम अगेनचे संवाद लेखक मिलाप झवेरी यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. त्याचे यापूर्वीचे चित्रपट फ्लॉप ठरले असतानाही रोहित शेट्टीने अर्जुनला इतक्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी का कास्ट केले, याबद्दल मिलाप झवेरी यांनी सांगितलं आहे. निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरची फिल्म इंडस्ट्रीतील कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. अर्जुन कपूरने 2012 मध्ये इशकजादे चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अर्जुन कपूरचे चित्रपट लागोपाठ फ्लॉप
अर्जुन कपूरचे अनेक हिट चित्रपट ठरले. मात्र, त्याच्या चित्रपटांपैकी बहुतेक चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे कमाई शकले नाहीत. बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही आणि ते फ्लॉप ठरले. यामध्ये पानिपत, द लेडीकिलर आणि कुट्टी या चित्रपटांचा समावेश आहे. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित त्यांचा संदीप और पिंकी फरार हा चित्रपट समीक्षकांना आवडला पण, तो सुपरहिट झाला नाही.
रोहित शेट्टीने अर्जुन कपूरला सिंघम अगेनमध्ये कास्ट करण्याचं कारण काय?
गेल्या काही काळात अर्जुनला हिट चित्रपट देता आला नसून त्याचे एका मागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत, असं असतानाही रोहित शेट्टीने अर्जुन कपूरला सिंघम अगेनमध्ये कास्ट करण्याचं कारण काय ते जाणून घ्या. याबद्दल सिंघम अगेन चित्रपटाचे संवाद लेखल मिलाप झवेरीने सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना सांगितलं की, "सिंघम अगेन चित्रपटासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने अर्जुन कपूरमधील प्रतिभा आणि उत्कंठा पाहिली. अर्जुन कपूरला फक्त एका योग्य संधीची गरज आहे आणि हीच त्याची प्रतिभा आहे, असा त्याचा विश्वास होता. हा चित्रपट प्रदर्शित झाला की रोहित किती योग्य होता ते आपण पाहू".
मिलाप झवेरी यांनी केलं रोहित शेट्टीचं कौतुक
मिलाप झवेरी यांनी एक चित्रपट निर्माता म्हणून रोहित शेट्टीचे कौतुक केलं. यावेळी ते म्हणाले, "त्याने अर्जुनला त्याच्या कुटुंबात स्वीकारलं आहे. त्याला विश्वास आहे की, तो कॉप युनिव्हर्सचा एक जबरदस्त भाग बनेल." मिलाप झवेरी पुढे म्हणाले, "रोहित भारतातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि खरोखर एक चांगला व्यक्ती आहे". सिंघम अगेन हा 2014 मध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम 2 चा सिक्वेल आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 या चित्रपटाशी होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :