(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Singham Again OTT Release: थिएटर गाजवल्यानंतर आता OTT वर डरकाळी फोडणार 'सिंघम अगेन'? कधी, कुठे पाहता येणार?
Singham Again OTT Release: अजय देवगणचा सिंघम अगेन या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला.
Singham Again OTT Release: दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2024) अजय देवगणनं सिंघम अगेन (Singham Again) रिलीज करून चाहत्यांना ट्रीट दिली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर जी चर्चा रंगली होती, तितकी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिसली नाही. तसं पाहायला गेलं तर रोहित शेट्टी दिग्दर्शित मल्टीस्टारर सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 सोबत बॉक्स ऑफिसवर झालेली टक्कर अजय देवगणला चांगलीच महागात पडली. थिएटरनंतर, चाहते आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिंघम अगेनच्या रिलीजची वाट पाहत आहेत. ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहिला नाही, ते आता OTT वर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. पण सिंघम अगेन ओटीटीवर कधी रिलीज होणार? कुठे पाहता येणार? यांसारखे अनेक प्रश्न आहेत.
सिंघम अगेन कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल?
सिंघम अगेनच्या ओटीटी रिलीजबद्दल बोलायचं तर हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर रिलीज होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेन 27 डिसेंबरला प्राईम व्हिडीओवर रिलीज होऊ शकतो. जर हा चित्रपट 27 डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित झाला, तर चाहत्यांसाठी नव्या वर्षाची ट्रीट ठरणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप रिलीजबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
सिंघम अगेनबाबत थोडसं...
सिंघम अगेनच्या कथेबद्दल सांगायचं तर त्यात आधुनिक रामायण दाखवण्यात आलं आहे. अर्जुन कपूरनं करीना कपूरचं अपहरण कसं केलं? त्यानंतर अजय देवगण त्याच्या संपूर्ण टीमसोबत करीनाला वाचवण्यासाठी जातो. हा चित्रपट ॲक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण आहे.
सिंघम अगेनच्या स्टारकास्टमध्ये कोण कोण आहेत?
चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर, अजय देवगणसोबत अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 सोबत टक्कर झाली. पण, भूल भुलैया 3 पुरून उरला आणि बॉक्स ऑफिसला अगदी सहज सिंघम अगेनला पछाडलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :