एक्स्प्लोर

Pushpa 2 Advance Booking: पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या? रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर दबदबा, अॅडव्हान्स बुकींगमध्येच छप्पडफाड कमाई

Pushpa 2 Advance Booking: पुष्पा 2 रिलीज होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. पण, त्यापूर्वीच पुष्पानं बॉक्सऑफिसवर आपला दबदबा राखला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटानं हिंदी प्री-सेलमध्ये अनेक चित्रपटांना मात दिली आहे.

Pushpa 2 Advance Booking: अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहद फासिल (Fahadh Faasil) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. पण, फक्त रिलीजपूर्वीच त्याची क्रेझ संपूर्ण जगभरात पसरली आहे. त्यामुळे सुकुमार दिग्दर्शित मास अॅक्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटाची तिकिटं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये हॉटकेकप्रमाणे विकली जात आहेत. प्री-तिकीट सेलमध्ये या चित्रपटानं फायटर आणि कल्की 2898 एडी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडले आहेत. एवढंच काय तर, 'पुष्पा- 2 द रूल'च्या अॅडव्हान्स बुकिंगमुळे पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 426 कोटी रुपयांची वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. 

'पुष्पा 2' कडून हिंदीतील टॉप चेन्समधील 'या' चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत

'पुष्पा 2: द रुल'नं 10:45 वाजेपर्यंत (2 डिसेंबर 2024) पहिल्या तीन नॅशनल चेन्स – PVRinox आणि Cinepolis मध्ये पहिल्या दिवसासाठी 1 लाख 52 हजार 500 पेक्षा जास्त तिकिटांची विक्री केली होती. पीव्हीआर आयनॉक्स 1 लाख 21 हजार 500 तिकिटांच्या बुकिंगसह प्री-सेलमध्ये आघाडीवर आहे, तर सिनेपोलिसनं जवळपास 31 हजार तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. यासह पुष्पा 2 नं 'फायटर' (1.25 लाख), 'कल्की 2898 AD' (1.25 लाख), 'RRR' (1.05 लाख), 'दृश्यम 2' (1.16 लाख) सारख्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे .

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'या' चित्रपटांना मागे टाकनं 'पुष्पा 2: द रुल'चं लक्ष्य 

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2: द रुल'चे आतापर्यंत 1.55 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. मंगळवारी याचे 2 लाख प्री-सेल पार करण्याची शक्यता आहे. पुष्पा 2 चं लक्ष्य नॅशनल चेन्समध्ये 5 लाख तिकीटं विकायची आहेत आणि हिंदीमध्ये आतापर्यंतची टॉप 5 सर्वात बाहुबली 2 (6.50 लाख), जवान (5.57 लाख), पठान (5.56 लाख) आणि केजीएफ चैप्टर 2 (5.15 लाख) मध्ये आपली पोजिशन सिक्योर करायची आहे. 

'पुष्पा 2'ची गुजरात, महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक कमाई 

गुजरात आणि महाराष्ट्रात प्री तिकीट सेलमध्ये पुष्पा 2 उत्तम परफॉर्म करत आहे. हा चित्रपट ओपनिंगच्या दिवशी सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. केवळ नॅशनल चेनमध्येच नाही तर 2 नॉन नॅशनल चेनमध्ये देखील मास ॲक्शनरनं मूव्हीमॅक्स चेनमध्ये 12,800 तिकिटं बुक केली आहेत, तर राजहंसनं जवळपास 25 हजार तिकिटं विकली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसे प्रमुख गैर-राष्ट्रीय साखळींमध्येही त्याच्या अॅडव्हान्स  बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nargis Fakhri Sister Aliya Fakhri Arrested: नर्गिस फाखरीची बहीण आलियाला अटक; न्यूयॉर्कमध्ये एक्स-बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला जिवंत जाळल्याचा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Bondi Beach Terror Attack: ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
Ram Sutar Passes Away: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
Embed widget