एक्स्प्लोर

Singham Again : 'सिंघम','सिम्बा', 'सूर्यवंशी' तिन्ही एकत्र येणार; 'सिंघम अगेन'च्या शूटिंगला सुरुवात

Rohit Shetty Film Singham Again : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे.

Ranveer Singh is back With Ajay Devgn Rohit Shetty in Singham Again : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) अभिनीत आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे. मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

'सिंघम अगेन'च्या मुहूर्तादरम्यानच्या फोटोंमध्ये सुपरस्टार अजय देवगनसह रणवीर सिंहदेखील सिम्बा लूकमध्ये दिसत आहे. रणवीर आणि अजयला एकत्र पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सुपरस्टार अजय देवगण आणि रोहित शेट्टीसह रणवीर सिंहदेखील पूजा करताना दिसत आहे. शूटिंग सुरू झाल्याने लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

'सिंघम' फ्रेंचाइजीचा तिसरा सिनेमा

अजय देवगन स्टारर 'सिंघम' फ्रेंचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टी सांभाळणार आहे. या सिनेमात बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगनसह सिम्बा लूकमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे. या सिनेमात दोघेही शत्रूंचा सामना करताना दिसणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

'सिंघम अगेन' या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची झलक दिसणार आहे. अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसेल. तर करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.

'सिंघम अगेन' कधी होणार रिलीज? (Singham Again Release Date)

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या सिनेमाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. अजय देवगन, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि करीना कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 'सिंघम' हा सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता  'सिंघम अगेन'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Singham 3 : 'सिंघम 3'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता; 2024 मध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget