Singham 3 Movie : 'सिंघम 3' मधल्या अर्जुन कपूरचा खुंखार व्हिलनचा फर्स्ट लूक आउट ; रोहित शेट्टी म्हणाला, जो चुका करतो तो...
Singham Again : सिंघम चित्रपटाचा सिक्वेल असणारा 'सिंघम अगेन' अर्थात 'सिंघम 3' या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आले.

Singham 3 Movie : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) अॅक्शनपट असलेल्या 'सिंघम' चित्रपटाच्या (Singham) तिसऱ्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या 'सिंघम अगेन'मध्ये (Singham Again) अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा खलनायकी भूमिका साकारणार आहे. बुधवारी, त्याने पोस्टर लाँच केले.
अर्जुनने शेअर केला लूक
अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'सिंघम अगेन' मधील स्वतःचे दोन फोटो शेअर केले. यातील एका फोटोत रणवीर सिंगही आहे. “सिंघम का खलनायक! असे कॅप्शन अर्जुनने दिले.
View this post on Instagram
अर्जुन कपूरच्या सिंघम अगेन लूकवर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया
रक्ताने माखलेला चेहरा असलेला अर्जुन कपूरच्या लूक चर्चा सुरू झाली आहे. अभिनेता वरुण धवनने हात उंचावणारा इमोजी टाकला. तर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने अर्जुनच्या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट दिली आहे.
अर्जुनचा फर्स्ट लूक शेअर करताना, चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवर म्हटले की, जी लोक चुका करतात...त्यांना त्याची शिक्षा मिळते...मात्र, आता जो येणार आहे तो शैतान आहे... असे रोहित शेट्टीने लिहिले आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स सिंघम अगेन, फ्रँचायझीमधील पाचवा भाग आणि सिंघम रिटर्न्स (2014) चा सिक्वेलसह परत येणार आहे. 'सिंघम 3' या टायटलखाली सप्टेंबर 2017 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि डिसेंबर 2022 मध्ये अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आली.
'सिंघम अगेन' ऑगस्ट 2024 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

