कॉन्सर्टमध्ये गाताना श्वास घ्यायला त्रास, गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली; सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हणाली...
Monali Thakur Health Update : गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Singer Monali Thakur Health Update : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॉन्सर्टदरम्यान मोनाली ठाकूरची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर आता मोनाली ठाकूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. गायिका मोनाली ठाकूरला कॉन्सर्ट दरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, ज्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आलं.
गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली
मोनालीचा कॉन्सर्टमधील परफॉर्मन्स संपल्यानंतर, तिने प्रेक्षकांची माफी मागितली आणि त्यांना सांगितले की ती पुढे परफॉर्म करू शकणार नाही. यानंतर ती माघारी परतली आता मोनालीने तिच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिलं आहे. गायिका मोनाली ठाकूरची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मोनाली ठाकूर एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होती, तिथे तिची तब्येत अचानक बिघडली आणि तिला शो सोडून रुग्णालयात जावं लागलं. यानंतर चाहते त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
कॉन्सर्टमध्ये गाताना श्वास घ्यायला त्रास
मोनाली ठाकूर कॉन्सर्टमध्ये 'तुने मारी एन्ट्री' हे गाणे गात असताना अचानक तिची तब्येत बिघडली. तिचा परफॉर्मन्स संपल्यानंतर, तिने प्रेक्षकांची माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की, तिला पुढील गाणी सादर करता येणार नाहीत. मोनालीने सांगितलं की, आज मला खूप अस्वस्थ वाटत आहे. एखाद्या गोष्टीचं वचन देणे आणि नंतर ती पूर्ण न करणे खूप कठीण असते, असंही तिने म्हटलं. मोनालीला स्टेजवर श्वास घेण्यास त्रास होत होता, ज्यामुळे ती स्टेजवरून उतरून निघून गेली, असं सांगितलं जात आहे.
सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हणाली...
आता या गायिका मोनाली ठाकूरने तिच्या तब्येतीबद्दल अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मोनाली ठाकूरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना लिहिलंय की, 'मला श्वास घ्यायला कोणताही त्रास होत नव्हता, पण मला व्हायरल इन्फेक्शन झाले होते आणि विश्रांती न घेतल्यामुळे माझी तब्येत बिघडली'.
महत्त्वाच्या इतर बातम्या :