एक्स्प्लोर

Arijit Singh : अरिजित सिंहने 'गेरुआ' वादावर सोडलं मौन; म्हणाला, "भगवा रंग स्वामी विवेकानंदांचा"

Arijit Singh : अरिजित सिंहने नुकतचं एका कॉन्सर्टदरम्यान 'गेरुआ' वादावर भाष्य केलं आहे.

Arijit Singh On Gerua Song Controversy : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) सध्या चर्चेत आहे. अर्जितने 'कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022' (Kolkata International Film Festival) मध्ये शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'दिलवाले' (Dilwale) या सिनेमातील 'रंग दे गेरुआ' (Rang De Gerua) हे सुपरहिट गाणं गायलं होतं. पण या गाण्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्याची पुढची कॉन्सर्टदेखील रद्द करण्यात आली. आता अरिजितने या 'गेरुआ' वादावर भाष्य केलं आहे. 

अरिजित सिंहची 18 फेब्रुवारीला कोलकाता येथे एक कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्टदरम्यान त्याने 'गेरुआ' वादावर मौन सोडलं. अरिजित म्हणाला,"फक्त एका रंगावरुन इतका वाद का? भगवा रंग हा संन्याशी लोकांचा रंग आहे. स्वामी विवेकानंद यांचा रंग आहे. त्यांनी जर पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली असती तर त्यावरुन काही वाद झाला असता का?"

View this post on Instagram
 
A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

अरिजित सिंहला उत्तर देत आमदार तापस रॉय म्हणाले की, "भगव्या रंगावर टीका करत नाही. हा रंग तिरंग्याचा एक भाग आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करु नये". कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत ज्यावेळी अरिजितने 'गेरुआ' हे गाणं गायलं त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील तिथे उपस्थित होत्या. त्यानंतर अरिजितची पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली होती. त्यावेळी भाजपने आरोप केला होता की, ममताचं सरकार भगव्या रंगाला घाबरल्याने पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे ममता यांनी सांगितले. अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रस या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला झाला होता.

अरिजित सिंहने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 'मर्डर 2' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने सिनेविश्वात पदार्पण केलं. तर 'आशिकी 2' या सिनेमातील त्याची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तो रातोरात स्टार झाला. 'फिर भी तुमको चाहूंगा', 'पछताओगे', 'पल', 'खैरियत', 'सोच ना सके', 'इलाही', 'हमारी अधुरी कहानी' या त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Happy Birthday Arijit Singh: घरातूनच मिळाला संगीताचा वारसा, अनेकदा नकार पचवूनही अरिजितने गाजवलं संगीत विश्व!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
Embed widget