(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी बांधली लग्नगाठ; शेअर केले फोटो
Aanandi Joshi And Jasraj Joshi: आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi) यांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच आनंदी आणि जसराज यांनी खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये जसराज आणि आनंदी यांच्या गळ्यात हार दिसत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंंट करुन अनेक नेटकरी या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.
आनंदी आणि जसराज यांनी शेअर केले फोटो
आनंदी आणि जसराज यांनी शेअर यांनी त्यांच्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत असताना तुम्ही आशीर्वाद द्यावा अशी आम्ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो."
अभिनेत्री तेजस्विनी पंडित, गायक सलील कुलकर्णी, अभिनेत्री श्रेया बुगडे आणि स्पृहा जोशी यांनी आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी देखील आनंदी आणि जसराज यांना शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आनंदी ही पेस्टल ग्रीन कलरची साडी आणि ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. तर जसराज हा ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.
2012 मधील सा रे ग म प या कार्यक्रमाचा जसराज विजेता ठरला. सतरंगी रे, हायवे, डबल सीट या चित्रपटांमधील गाणी जसराजनं गायली आहेत. तर आनंदी ही देखील प्रसिद्ध गायिका आहे.तिनं देवा तुझ्या गभर्याला, बरासून ये, किती सांगायचय मला ही गाणी गायली आहेत. 2006 ते 2007 च्या दरम्यान ती आयडिया सा रे ग मा पा या रिअॅलिटी म्युझिक शोमध्ये 3 री रनर अप होती. जवई विकत घेणे आहे, लगोरी आणि तुझ माझा जमेना या मालिकेचे टायटल साँग्स देखील आनंदीनं गायले आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: