Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचं आजारपणानंतर जोरदार कमबॅक; महेश मांजरेकरांच्या सिनेमात झळकणार प्रमुख भूमिकेत
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेचा 'ही अनोखी गाठ' (Hi Anokhi Gath) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Shreyas Talpade : श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी त्याने गाजवली आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचा तो भाग आहे. पण काही दिवसांपूर्वी एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. आता आजारपणानंतर श्रेयस एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे.
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' (Hi Anokhi Gath) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले (Gauri Ingawale) यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.
श्रेयस तळपदेने पोस्ट शेअर करत दिली माहिती (Shreyas Talpade Post)
अभिनेता श्रेयस तळपदेने पोस्ट शेअर करत 'ही अनोखी गाठ' या सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत श्रेयसने लिहिलं आहे,"नव्या वर्षाची सुरुवात एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमाने.. झी स्टुडिओज प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी 'ही अनोखी गाठ'. 1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित'.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र
'ही अनोखी गाठ' चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे तर चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल : महेश मांजरेकर
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले,"झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच".
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात,"झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येत असते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झाले आहे. त्यामुळे यांच्यासोबत प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत".
संबंधित बातम्या