Shreyas Talpade : 'बॉलीवूडमध्ये स्वत:च्या कामाचं भांडवल करावंच लागतं', बॉलीवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या श्रेयसचं वक्तव्य चर्चेत
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे याने बॉलीवूडविषयी केलंल वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आलं आहे. तसेच तो आता लवकरच कर्तम भुगतम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shreyas Talpade : मराठी मालिकाविश्व, मराठी रंगभूमी, मराठी सिनेमासह अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) बॉलीवूडवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक बॉलीवूड सिनेमांमधून श्रेयस प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरला. आयुष्यातल्या एका कठिण काळाचा धैर्याने सामना केल्यानंतर, श्रेयसने पुन्हा एकदा वेलकम बॅक म्हटलं आहे. त्यानंतर तो महेश मांजरेकर यांच्या ही अनोखी गाठ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातच आता तो 'करमत भुगतम' या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण यादरम्यान श्रेयसच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
अभिनेता श्रेयस तळपदेने नुकतच नवभारत टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये श्रेयसने बॉलीवूडच्या मुद्यावरही भाष्य केलं आहे. 'करतम भुगतम' या चित्रपटात श्रेयस तळपदे, विजय राज, मधू आणि अक्षा पारदासनी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 17 मे 2024 रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. पण त्याआधी श्रेयसच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
श्रेयसने नेमकं काय म्हटलं?
श्रेयसला यावेळी उत्कृष्ट अभिनेता असताना तुला चांगले सिनेमे आणि भूमिका मिळाल्या नाहीत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी श्रेयसने म्हटलं की, तांत्रिकदृष्ट्या अशा प्रश्नांची उत्तर देता येत नाहीत. कधीकधी आपल्याला वाटतं की, आपल्यातच काहीतरी कमरता आहे. पण मला असं वाटतं की, जेवढा चांगला अभिनेता म्हणून माझी ओळख आहे, तितकचं चांगलं मार्केटिंग मला माझ्या कामाचं करता यायला हवं होतं. मी चाललेल्या चित्रपटांच्या यशाचे भांडवल करायला हवे होते, जे मी केले नाही.
स्वत:च्या कामाचं मार्केटिंग करता यायलाच हवं - श्रेयस तळपदे
स्वत:च्या कामाचं मार्केटिंग करणं हे आपल्या प्रोफेशनमध्ये गरजेचं असतं. पण आम्ही थिएटरमधून आलेली लोकं आहोत. त्यामुळे स्वत:च्याच कामाचं भांडवल का करावं असं आम्हाला वाटतं. तिथे आम्हाला शिकवलंय की, चांगलं काम केलं तर चार लोकं तुमच्याविषयी बोलतील. पण हे पूर्ण सत्य नाही. चांगल काम करा, ही गोष्ट आहेच. पण त्या कामाची मार्केटिंगही करणं तितकचं गरजेचं आहे.कधी कधी मलाही वाटतं की काही फुलं उशिरा उमलतात, त्यांना तेवढा वेळ द्यायला हवा. कदाचित आता माझी वेळ आहे. आता मी काही गोष्टी बरोबर करत आहे. माझे रिलीज होणारे चित्रपट, मग ते 'कर्तम भुगतम', 'कंपकम्पी', 'इमर्जन्सी', 'वेलकम टू जंगल' किंवा 'पुष्पा' असोत, मी स्वत:ला नव्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं श्रेयसने म्हटलं आहे.