Shraddha Kapoor : वयाने लहान आहे श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड, 'स्त्री' संपत्तीही खूप पुढे; जाणून घ्या फिल्मी लव्ह स्टोरी
Shraddha Kapoor Boyfriend Rahul Mody : राहुल मोदी तो श्रद्धा कपूरपेक्षा वयाने लहान आहेच, पण कमाईतही तो तिच्या स्वप्नातील राजकुमारापेक्षा खूप मागे आहे.

Shraddha Kapoor and Rahul Mody : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. श्रध्दा कपूर तिच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेक वेळा चर्चेतील असते. श्रध्दा कपूरचं नाव अनेक वेळा राहुल मोदीसोबत जोडलं जातं. श्रद्धा आणि राहुल रिलेनशिपमध्ये असल्याच्या बातम्या अनेकदा व्हायरल होतात. आता श्रध्दाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर राहुलसोबतचा फोटो शेअर केल्याने यांच्या नात्याची पुन्हा चर्चा रंगली आहे.
श्रध्दा कपूरचा रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदी कोण आहे, तो काय करतो आणि त्याची एकूण संपत्ती किती आहे, ते जाणून घ्या.
वयाने लहान आहे श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड
श्रध्दा कपूर आणि राहुल मोदी या दोघांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली, या दोघांची लव्ह स्टोरी अगदी फिल्मी आहे. श्रद्धा कपूर 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात काम करत होती. त्याच चित्रपटाच्या सेटवर तिची राहुल मोदीसोबत भेट झाली. राहुल मोदी या चित्रपटाचा लेखक आहे. याशिवाय त्याने लव रंजन यांचा 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटाचं लेखन केलं आहे.
जाणून घ्या फिल्मी लव्ह स्टोरी
राहुल मोदी हा मूळचा मुंबईचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब व्यवसायात आहे, पण चित्रपटांमध्ये रस असल्याने तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. राहुलने नामांकित व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमधून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतलं आहे. यानंतर त्याने चित्रपटाच्या सेटवर इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केली.
वयाने श्रध्दापेक्षा लहान आहे राहुल
राहुल मोदीचा जन्म 7 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. तर, श्रद्धा कपूरचा जन्म 3 मार्च 1987 रोजी झाला. या दोघांच्या वयात तीन वर्षांचा फरक आहे. चित्रपट लेखक असण्यासोबतच, राहुल एक सहाय्यक दिग्दर्शक देखील आहे.
राहुल मोदींची एकूण संपत्ती किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते एक-दोन दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे 15000 हून अधिक फॉलोअर्स असूनही, राहुलने काहीही पोस्ट केलेले नाही.























