एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींवरील लघुपटाचं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्क्रीनिंग होणार
'चलो जिते है' हा लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा खेळ राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवला जाणार आहे. 'चलो जिते है' हा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
याबाबत कोणतंही पत्र शासनाकडून काढलं गेलेलं नसलं, तरी जिल्हाप्रमुख, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना आदेश दिल्याचं सांगितलं जातं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार 18 सप्टेंबरला हा चित्रपट विविध शाळांमध्ये दाखवला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी 30 मिनिटांच्या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
'चलो जीते है' हा चित्रपट elearning.parthinfotech.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे प्रचारतंत्रात विद्यार्थ्यांना सामावून घेतलं जात असल्याने काही शिक्षकांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आहे.
सर्व शाळांमध्ये पुढील सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना
1. लॅपटॉप / डेस्कटॉप कॉम्प्युटर
2. कमीत कमी 1 MBPS इंटरनेटचा स्पीड
3. प्रोजेक्टर आणि स्क्रीन
4. साऊंड सिस्टिम
हा लघुचित्रपट प्रक्षेपित करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याची आवश्यता आहे.
1. लॅपटॉप / डेस्कटॉप कॉम्प्युटरमधील “Google Chrome” ब्राऊझर सुरु करावा.
2. त्यानंतर “Address Bar” मध्ये http://elearning.parthinfotech.in असे टाईप करून कीबोर्ड वरील “Enter” बटन दाबावे.
3. त्यानंतर ▶ “Play” बटनावर क्लिक करावे.
4. त्यानंतर हा लघुचित्रपट स्क्रीनवर प्रक्षेपित झालेला दिसेल.
जुलै महिन्यात मुंबईतल्या लोअर परळ भागातील फिनिक्स मॉलमध्ये 'चलो जिते है'चं स्क्रीनिंग झालं होतं. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उद्योगपती मुकेश अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कंगना रनौत, अक्षय कुमार यासारखे मान्यवर उपस्थित होते. मोदी देशहिताचं काम करत आहेत, त्यांना पुन्हा संधी द्या, असं आवाहन कंगना रनौतने स्क्रीनिंगनंतर केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement