एक्स्प्लोर

शिवसेनेचीही 'काशिनाथ घाणेकर' प्राईम टाईमच्या वादात उडी

'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट शाखेच्या उपाध्यक्ष पदावर आहेत. मात्र, 'घाणेकर' ऐवजी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या हिंदी चित्रपटाला सिनेमागृहातील प्राईम टाईम शोज दिले असतानाही शिवसेना गप्पच होती.

मुंबई : 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसेने केलेल्या आंदोलनानंतर आता शिवसेनेनेही या वादात उडी घेतली आहे. 'काशिनाथ घाणेकर' चित्रपटासाठी शिवसेनेने मुंबईतील बोरिवलीत असलेल्या 'सोना गोल्ड' चित्रपटगृहासमोर 'दे धक्का' आंदोलन केलं. मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट पाडव्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्याच्या विविध भागात हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी या सिनेमाला प्राईम टाईम मिळत नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी होती. 'काशिनाथ घाणेकर' चित्रपटाला सिनेमागृहात पुरेसे शो मिळत नसल्यावरुन काही दिवसांपूर्वी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. कल्याण, गिरगावमधील चित्रपटगृहात जाऊन मनसेने निवेदनं दिली होती. त्यानंतर मल्टिप्लेक्स चालक ताळ्यावर येऊन त्यांनी मनसेला लेखी आश्वासन दिलं. विशेष म्हणजे, 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट शाखेच्या उपाध्यक्ष पदावर आहेत. मात्र, 'घाणेकर' ऐवजी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या हिंदी चित्रपटाला सिनेमागृहातील प्राईम टाईम शोज दिले असतानाही शिवसेना गप्पच होती. मनसेने सुबोध भावेंच्या चित्रपटाच्या बाजूने आंदोलन छेडल्यावर शिवसेनेनेही आता यात उडी घेतली. 'दे धक्का' हे आंदोलन आमदार प्रकाश सुर्वे आणि विलास पोतनीस यांच्या नेतृत्वात झाले. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, नंदिता पाटकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget