शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
shilpa shetty Family Corona Positive: अलीकडेच शिल्पा शेट्टी यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक भावनिक पोस्ट शेअर केली. यात तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना विषाणूची लागण असल्याची माहिती दिली.

कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेने देशातील प्रत्येक व्यक्तीला विचार करायला भाग पाडले आहे. सामान्य असो की विशेष व्यक्ती कोरोनाने कोणालाच सोडले नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले आहेत. अलीकडेच शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती शिल्पाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.
सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताना शिल्पा शेट्टी यांनी लिहलंय की, '10 दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. सुरुवातीला माझ्या सासर्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर माझे पती राज, माझी आई समिशा आणि विवान यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले. प्रत्येकजण प्रोटोकॉलचे पालन करीत आहे. कुटुंब सर्व सदस्य आपापल्या खोल्यांमध्ये स्वतंत्रपणे राहत आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ला घेत आहेत.
View this post on Instagram
यासह ती पुढे म्हणाली की, त्यांच्या घरातील दोन कर्मचार्यांनाही संसर्ग झाला आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. देवाच्या कृपा आहे की प्रत्येकजण रिकव्हर होत आहे. यावेळी तिने सर्वांनी मास्क, सॅनिटायझर आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहण्याचे आवाहन केलंय.
बॉलिवूड कलाकारही मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. गेल्या वर्षी 2020 मध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या पॉझिटिव्ह होते. अक्षय कुमार, गोविंदा, आमिर खान, कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, कतरिना कैफ, विक्की कौशल यांच्यासह इतर कलाकारांनाही यंदा संसर्ग झाल्याचे आढळले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
