एक्स्प्लोर

Shehzada Box Office Collection Day 3: कार्तिकचा 'शहजादा' सुपरफ्लॉप! वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला

 कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जाणून घ्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Shehzada Box Office Collection Day 3:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा  'भूल भुलैया 2' हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत.  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे.  

शेहजादाचं कलेक्शन 

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन  (Kriti Sanon) यांच्या शहजादा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'शहजादा चित्रपटानं ओपनिंग-डेला 6 कोटींची  कमाई केली. हा चित्रपट वीकेंडला चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात होता. शनिवारी (18 फेब्रुवारी) या चित्रपटानं भारतामध्ये 6.65 कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटानं रविवारी (19 फेब्रुवारी) म्हणजेच तिसऱ्या दिवशी 7.55 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई आता 20.20 कोटी झाली आहे.' अशी माहिती तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली.  हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच कार्तिकच्या चाहत्यांना मिळेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी  2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon)  यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक चित्रपट असला तरी या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शहजादा हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा 'अला वैकुंठपुरमलो'  हा चित्रपट रिलीज झाला होता. 

काही दिवसांपूर्वी दुबईमधील बुर्ज खलिफावर कार्तिकच्या शहजादा या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. त्यावेळी कार्तिकनं बुर्ज खलिफाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मला शेहजादा झाल्यासारखं वाटतं आहे. टॉप ऑफ द वर्ल्ड' 

महत्वाच्या इतर बातम्या : 

'पठाण' नंतर आता 'शहजादा' झळकला बुर्ज खलिफावर ; कार्तिक आर्यनकडून खास व्हिडीओ शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget