एक्स्प्लोर

'पठाण' नंतर आता 'शेहजादा' झळकला बुर्ज खलिफावर ; कार्तिक आर्यनकडून खास व्हिडीओ शेअर

शेहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

Shehzada Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)  हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता त्याचा शेहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता शेहजादा या चित्रपटाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे. नुकतीच कार्तिकनं एक खास व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली.

कार्तिकनं शेअर केला व्हिडीओ

कार्तिकनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो दुबईमध्ये गेलेला दिसत आहे. कार्तिकला पाहण्यासाठी दुबईमधील चाहत्यांनी गर्दी केली होती, असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुबईमधील बुर्ज खलिफावर कार्तिकच्या शेहजादा या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'मला शेहजादा झाल्यासारखं वाटतं आहे. टॉप ऑफ द वर्ल्ड' व्हिडीओमध्ये कार्तिक हा बुर्ज खलिफासमोर फाऊंटन शो पाहताना देखील दिसत आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

शेहजादा या चित्रपटाच्या आधी शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर देखील बुर्ज खलिफावर झळकला होता. पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता शेहजादा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरच कार्तिकच्या चाहत्यांना मिळेल. 

शेहजादा चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

शेहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी  2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon)  यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शेहजादा हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा 'अला वैकुंठपुरमलो'  हा चित्रपट रिलीज झाला होता. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Shehzada Title Track Releases: 'मैं जो आ गया...'; कार्तिक आणि क्रितीच्या 'शेहजादा'मधील गाणं रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget