Shaitaan Movie R. Madhavan : लोकांचे काय सांगताय? 'शैतान' अवतार पाहून माधवनची पत्नीही घाबरली, म्हणाली माझ्यापासून...
Shaitaan Movie R. Madhavan : 'शैतान'मधील माधवनच्या लूकचे लोकांकडून कौतुक सुरू आहे. थरकाप उडवणाऱ्या माधवनच्या लूकवर त्याची पत्नीदेखील घाबरली.
Shaitaan Movie R. Madhavan : सुपरनॅचरल चित्रपट 'शैतान'चा (Shaitaan Movie) ट्रेलर गुरुवारी लाँच करण्यात आल्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजय देवगण (Ajay Devgan) आणि ज्योतिकाच्या अभिनयाची झलक यात दिसलीच, पण सगळ्यात जास्त भाव आर. माधवन (R. Madhavan) खाऊन गेला आहे. माधवनच्या लूकचे लोकांकडून कौतुक सुरू आहे. थरकाप उडवणाऱ्या माधवनच्या लूकवर त्याची पत्नीदेखील घाबरली.
रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणारा आर. माधवन या शैतान चित्रपटात भयानक अवतारात दिसत आहे. ट्रेलरपासूनच त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. ट्रेलर लाँचच्या निमित्ताने माधवनने हा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले आहे.
माधवनची पत्नी घाबरली...
'बॉलीवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, माधवनने ट्रेलर लॉन्चच्या वेळी 'शैतान'च्या लूकवर पत्नीची प्रतिक्रिया सांगितली. त्याने हसत सांगितले की, मला आठवतंय जेव्हा मी तिला ट्रेलर आणि चित्रपट दाखवला त्यानंतर ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागली. माझ्यापासून थोडं लांब राहूनच बोल असे तिने सांगितले. त्यामुळे या चित्रपटाचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर खूप प्रभाव पडला आहे, असे मला वाटत असल्याचे माधवन याने सांगितले.
View this post on Instagram
'शैतान'मध्ये असलेला हॉरर इतक्या उच्च पातळीला जाईल असे वाटत नव्हते, असेही माधवनने सांगितले. जेव्हा मी चित्रपट करायचं ठरवलं, तेव्हा आपण भयपटाच्या कोणत्या पातळीवर जाणार आहोत याची मला अजिबात अपेक्षा नव्हती किंवा आपण कोणत्या स्तरावर लोकांना घाबरवणार आहोत याचा विचारही केला नव्हता, असेही माधवन याने पुढे सांगितले.
माझा स्वत: वरच विश्वास बसेना
माधवनने पुढे सांगितले की,' या चित्रपटात काम करताना मी असं काही करेल की ज्याने कुटुंबीय घाबरतील असे काम करेल असे वाटले नव्हते. लोकांचा थरकाप उडेल असे काम करेल असे वाटलेच नव्हते असेही माधवन याने सांगितले.
या वर्षाच्या सुरुवातीला अजयने 'शैतान'ची घोषणा केली होती. या चित्रपटात मुख्य भूमिका करण्यासोबतच तो या चित्रपटाचा निर्माताही आहे. 1997 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ज्योतिका 25 वर्षांनंतर हिंदी चित्रपटात काम करणार आहे. त्याने 2001 मध्ये 'लिटिल जॉन' या हिंदी-तमिळ चित्रपटात शेवटचे काम केले होते. माधवन 'शैतान'मध्ये पहिल्यांदाच अजयसोबत काम करणार आहे. हा चित्रपट 8 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.