Kabhi Eid Kabhi Diwali : शहनाजने सुरू केली 'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगला सुरुवात; सिद्धार्थच्या आठवणीत झाली भावूक
Kabhi Eid Kabhi Diwali : शहनाज गिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Kabhi Eid Kabhi Diwali : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाजने आता 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खाननेदेखील 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. कभी ईद कभी दिवाली' या सिनेमात शहनाज सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मासोबत (Aayush Sharma) दिसणार आहे.
सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज भावुक
मीडिया रिपोर्टनुसार, शहनाज गिलला तिच्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करायला आवडतात. शहनाजला स्वप्न साकार करायलादेखील आवडतात. शहनाज अनेकदा सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक होत असते. शहनाज प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करत असते. त्यामुळे तिला सिद्धार्थच्या आठवणींतून बाहेर पडायला मदत झाली. तसेच सध्या शहनाजने 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
सलमान खान अॅक्शन मोडमध्ये
सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत त्याचे लांबलचक केस दिसत आहेत. तसेच तो अॅक्शनमोडमध्येदेखील दिसत आहे. सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमात तेलुगू अभिनेते वेंकटेश दग्गुबातीदेखील दिसणार आहेत. मुंबईतील विले पार्लेमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनमाचे दिग्दर्शन फरहाज सामजी करत आहेत. तर या सिनेमात पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यापूर्वी 2023मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2023 मध्ये नाही, तर याच वर्षी म्हणजेच 2022 मध्ये रिलीज होणार आहे. साजिद नाडियादवालानिर्मित ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
'कभी ईद कभी दिवाली' सिनेमा व्यतिरिक्त सलमान खान दिसणार 'या' सिनेमात
'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमा व्यतिरिक्त सलमान खान 'टायगर 3' मध्येदेखील दिसणार आहे. तसेच शाहरुख खानच्या 'पठाण' आणि तेलुगू सिनेमा 'गॉड फादर' मध्येदेखील सलमान खानची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गॉड फादर' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
संबंधित बातम्या