Kabhi Eid Kabhi Diwali : ‘कभी ईद कभी दिवाली’च्या शूटिंगला सुरुवात; सलमानच्या लूकने चाहत्यांना लावले वेड
Kabhi Eid Kabhi Diwali : सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे.
Kabhi Eid Kabhi Diwali : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमानने एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो शेअर करत चाहत्यांना सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. पण हा फोटो ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे, असे अद्याप दबंग खानने जाहीर केलेले नाही. रिपोर्टनुसार, ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात झाली आहे. पूजा हेगडेनेदेखील एक फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती.
सलमान खान अॅक्शन मोडमध्ये
सलमान खानने शेअर केलेल्या फोटोत त्याचे लांबलचक केस दिसत आहेत. तसेच तो अॅक्शनमोडमध्येदेखील दिसत आहे. सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमात तेलुगू अभिनेते वेंकटेश दग्गुबातीदेखील दिसणार आहेत. मुंबईतील विले पार्लेमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनमाचे दिग्दर्शन फरहाज सामजी करत आहेत. तर या सिनेमात पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खानचा याआधी 'अंतिम' सिनेमामध्ये लांबलचक केस असलेला लूक होता. आता 'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमातदेखील सलमान लांबलचक केसांमध्ये दिसणार आहे. सलमानचे चाहचे 'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाची आता आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी पूजा हेगडेनेदेखील सलमानचे ब्रेसलेट घालून तो फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला होता.
View this post on Instagram
सलमान खानचे आगामी सिनेमे
'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमा व्यतिरिक्त सलमान खान 'टायगर 3' मध्येदेखील दिसणार आहे. तसेच शाहरुख खानच्या 'पठाण' आणि तेलुगू सिनेमा 'गॉड फादर' मध्येदेखील सलमान खानची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गॉड फादर' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यापूर्वी 2023मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2023 मध्ये नाही, तर याच वर्षी म्हणजेच 2022 मध्ये रिलीज होणार आहे. साजिद नाडियादवालानिर्मित ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
Kabhi Eid Kabhi Diwali : ना ईद ना दिवाळी, सलमान खानचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
'झिरो'च्या अपयशाने शाहरुख धक्का बसला तसेच 'राधे'नंतर सलमान खानच्या बाबतीत झालं; 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाचं काय होणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)