एक्स्प्लोर
शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह'चा ट्रेलर लाँच
या सिनेमातील शाहिदच्या लुकची सध्या चर्चा आहे. बाहुबली साकारलेल्या अभिनेता प्रभासने देखील शाहिदच्या या लुकचं कौतुक केल्याचं शाहिदने ट्रेलर लाँचिंगवेळी बोलताना सांगितलं.
मुंबई : अभिनेता शाहिद कपुरची मुख्य भुमिका असलेल्या 'कबीर सिंह' या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला आहे. हैदर आणि उडता पंजाब या सिनेमांनंतर शाहिद कपूर पुन्हा एकदा एका वेगळ्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील शाहिदच्या लुकची सध्या चर्चा आहे. बाहुबली साकारलेल्या अभिनेता प्रभासने देखील शाहिदच्या या लुकचं कौतुक केल्याचं शाहिदने ट्रेलर लाँचिंगवेळी बोलताना सांगितलं.
'कबीर सिंह' हा 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'अर्जुन रेड्डी' या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. अर्जुन रेड्डीमध्ये अभिनेता विजय देवराकोंडा याने मुख्य भुमिका साकारली होती. त्याच भुमिकेत शाहिद कपुर दिसणार आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने या सिनेमात शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं आहे. अर्जुन रेड्डी या सिनेमाचं देखील लेखन/दिग्दर्शन संदीप यांनीच केलं आहे.
'अर्जुन रेड्डी' ला सेन्सर बोर्डाकडून 'ए सर्टिफिकेट' मिळालं होतं. मात्र 'कबीर सिंह'ला सेन्सर बोर्डाने 'यू/ए सर्टिफिकेट' द्यावं अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. या सिनेमात चुकीच्या पद्धतीने कोणतीही गोष्ट दर्शवण्यात आलेली नाही त्यामुळे यू/ए सर्टिफिकेट मिळावं अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर नशेच्या आहारी गेलेल्या एका तरुणाच्या भूमिकेत दिसतो आहे. या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचे शाहिदने ट्रेलर लाँचिंगवेळी सांगितले. तसेच ज्याप्रकारे लोकांनी 'अर्जुन रेड्डी'ला जोरदार प्रतिसाद दिला होता तशाच प्रकारे 'कबीर सिंह'ला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळेल अशी आशा यावेळी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement