Shah Rukh Khan : ‘ब्रह्मास्त्र’मधील शाहरुख खानचा बॉडी डबल सोशल मीडियावर चर्चेत, हॉलिवूडमध्येही झळकलाय चेहरा!
Shah Rukh Khan : सध्या शाहरुख खानचा बॉडी डबल हसित सवानीचा (Hasit Savani) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आलिया-रणबीरसोबतच या चित्रपटात अनेक कलाकारांच्या छोट्या छोट्या भूमिका आहेत. बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची देखील या चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. या चित्रपटातील भूमिकेमुळे शाहरुख खान प्रचंड चर्चेत आहे. पण सध्या शाहरुख खानपेक्षा त्याचा बॉडी डबल चर्चेत आला आहे.
सध्या शाहरुख खानचा बॉडी डबल हसित सवानीचा (Hasit Savani) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉडी डबल हसित सवानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान आणि हसित सवानी एकाच कपड्यात आणि एकाच लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत हसित सवानीने इन्स्टा कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्रह्मास्त्र'मधील दिग्गज शाहरुख खानच्या कॅमिओसाठी त्याचा स्टंट डबल म्हणून करताना खूप मजा आली.'
पाहा फोटो :
‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खानने ‘वानरस्त्रा’च्या भूमिकेत कॅमिओ आहे. तो एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसला आहे. शाहरुखसोबतच्या स्टंट डबलचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
कोण आहे हसित सवानी?
बॉडी डबल आणि स्टंट्सच्या जगात हसित सवानी हे एक मोठे नाव आहे. हसितने केवळ टीव्ही आणि बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही काम केले आहे. हसितने ‘पेनीवर्थ’, ‘वंडर वुमन’, ‘जस्टिस लीग’, ‘नो टाइम टू डाय’, ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘अॅव्हेंजर्स’मध्येही काम केले आहे. हसित 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' या चित्रपटातही झळकला आहे.
शाहरुख खाननं 'ब्रह्मास्त्र'मध्ये 'वानरास्त्र' ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ केला. व्यक्तिरेखा लहान असली, तरी शाहरुखने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामधील शाहरुखच्या लूकचा फोटो शेअर केला आहे.
‘ब्रह्मास्त्र’च्या पुढच्या भागांची आतुरता
‘ब्रह्मास्त्र’ ही तीन चित्रपटांची सीरिज आहे, ज्याचा पहिला भाग ‘शिवा’ हिट झाला आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘देवा’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र 2’ देव आणि अमृता यांच्याभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत, मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :