(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shah Rukh Khan: शाहरुखचं एक ट्वीट अन् स्विगीचे डिलिव्हरी बॉइज पोहोचले मन्नत बाहेर; फोटो व्हायरल
Shah Rukh Khan: स्विगीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला मन्नत बाहेरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा ट्विटरवर अनेक वेळा चाहत्यांच्या प्रशांची उत्तरं देत असतो. आस्क एस आर के (#AskSRK) या हॅश टॅगचा वापर करुन काही चाहते शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारतात. नुकताच ट्वीटरवर शाहरुखला एका नेटकऱ्यानं ,"भावा जेवलास का?" असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं. शाहरुखच्या त्या उत्तरानंतर स्विगीचे काही डिलिव्हरी बॉइज मन्नत बाहेर पोहोचले.
ट्वीटरवर शाहरुखला एका नेटकऱ्यानं, "भावा जेवलास का?" असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला शाहरुख उत्तर देत म्हणाला, "भावा तू स्विगीमध्ये काम करतो का? पाठवशील का?" शाहरुखच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर स्विगी कंपनीनं शाहरुखच्या ट्वीटला रिप्लाय दिला होता, "आम्ही स्विगीमध्ये आहोत. पाठवू का?".
Kyun bhai aap Swiggy se ho….bhej doge kya?? https://t.co/Jskh69QEqc
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 12, 2023
आता स्विगी कंपनीनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'हम स्विगी वाले है और हम डिनर लेके आगाये'. स्विगी कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, सात डिलिव्हरी बॉइज हे मन्नत बाहेर उभे आहेत. स्विगी कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
hum swiggy wale hai aur hum dinner leke aagaye 🥰 https://t.co/iMFJcYjUVm pic.twitter.com/swKvsEZYhC
— Swiggy (@Swiggy) June 12, 2023
आस्क एसआकरेदरम्यान एका चाहत्याने शाहरुखला सिगरेट कायमची सोडली का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख म्हणाला,"हा.. मी खोटं बोललो... मी त्या कॅन्सर स्टिकच्या आहारी गेलो आहे"
शाहरुखचे चित्रपट
शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात शाहरुखसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
इतर महत्वाच्या बातम्या: