Shah Rukh Khan : 'भावा जेवलास का?', 'सिगरेट ओढतोस का?'; चाहत्यांच्या प्रश्नांना किंग खाननं दिली भन्नाट उत्तरं
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चर्चेत आहे. नुकतचं 'आस्क एसआरके' (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. एका नेटकऱ्याने शाहरुखला सांगितलं की,"मला वाटतं की माझी मांजर तुझ्या प्रेमात आहे". यावर उत्तर मजेशीर अंदाजात उत्तर देत शाहरुख म्हणाला,"मांजराला माझं प्रेम द्या... आता ज्यादिवशी कुत्र्यांना माझे सिनेमे आवडायला लागतील त्यादिवशी मी सेट असेन".
Give my love to the cat….now just need some dogs to also start liking my films and I will be set!! https://t.co/DB2YWFG5hh
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 12, 2023
शाहरुखच्या एका चाहत्याने 'आस्क एसआरके'सेशनमध्ये त्याला विचारलं आहे,"माझ्या मित्राचा तू क्रश आहेस..काय करू?". यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"तुला काय करायचं आहे? मला सांग फक्त आता मी काय करू". एका चाहत्याने त्याला विचारलं,"भावा जेवलास का?". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"भावा तू स्विगीमध्ये काम करतो का? पाठवशील का?". तर शाहरुखच्या या ट्वीटला उत्तर देत स्विगीने लिहिलं आहे,"आम्ही स्विगीमध्ये आहोत. पाठवू का?".
Kyun bhai aap Swiggy se ho….bhej doge kya?? https://t.co/Jskh69QEqc
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 12, 2023
hum hain swiggy se, bhej dein kya??? 🥰 https://t.co/iMFJcYksKU
— Swiggy (@Swiggy) June 12, 2023
'डंकी' की 'जवान' कोणता सिनेमा करणं सर्वात कठीण होतं? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"जवान' हा सिनेमा अॅक्शनपट असल्यामुळे तो करणं सर्वात कठिण होतं". आंघोळ करताना गाणं गुणगुणतो का? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"नाही.. मला खूप कंटाळा येतो. तुम्ही नाईट क्लबमध्ये कधी आंघोळ करता का?".
शाहरुख खान सिगरेट ओढतो का?
आस्क एसआकरेदरम्यान एका चाहत्याने शाहरुखला सिगरेट कायमची सोडली का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख म्हणाला,"हा.. मी खोटं बोललो... मी त्या कॅन्सर स्टिकच्या आहारी गेलो आहे". किंग खानने 2011 मध्ये एका मुलाखतीत सिगरेट ओढण्याबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणालेला,"मला झोप येत नाही. दिवसाला मी 100 सिगरेट ओढतो आणि तीस कप ब्लॅक कॉफी पितो".
Yes he lied, surrounded by a thick plume of smoke from his cancer stick!!! https://t.co/GmKlXV296K
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 12, 2023
शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट (Shah Rukh Khan Upcoming Project)
शाहरुख खान शेवटचा 'पठाण' (Pathaan) या सिनेमात झळकला होता. त्याचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता एटली कुमार दिग्दर्शित 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील दिसणार आहे. शाहरुखचा हा सिनेमा 7 स्प्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याच्या 'डंकी' (Dunki) या सिनेमाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या