एक्स्प्लोर

Pathan Shooting Begin : किंग खानच्या 'पठाण'चं चित्रिकरण 4 जूनपासून मुंबईत?

किंग खानच्या पठाण या चित्रपटासाठी चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत, चित्रपटाचं 70 टक्के शूटिंग पूर्ण झालं असूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चित्रिकरणात अडथळा आणला. मात्र आता उर्वरित चित्रिकरण लवकरच सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान मोठ्या पडद्यावर येण्यासाठी कमालीचा उत्सुक आहे. सध्या तो सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या सिनेमावर काम करतोय. या चित्रपटात त्याच्यासह दीपिका पादुकोणही असणार आहे. सिनेमाचं 70 टक्के चित्रिकरण पूर्ण झालं आहे. आता उर्वरित चित्रिकरण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे थांबलं होतं. पण आता या चित्रपटाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

शाहरुख खान क्वॉरंटाईन तर 'पठाण'च्या सेटवर कोरोना केसेसच्या बातम्यांनी खळबळ, बातम्या खोट्या असल्याची सूत्रांची माहिती

बॉलिवूडमधल्या एका नामांकित वेबसाईटनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आणि पु्न्हा एकदा चित्रिकरण थांबवावं लागलं. आता महाराष्ट्रातला कोरोनाचा आकडा कमी येऊ लागला आहे. दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना चित्रिकरण चालू करण्यासंदर्भत आग्रह धरला आहे. असं असताना मुख्यमंत्री चित्रिकरण चालू व्हावं यासाठी अनुकूल आहेत. त्याचवेळी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइज अर्था फॉइसनेही मुख्यमंत्र्यांकडे चित्रिकरणाला परवानगी देण्याबद्दल निवेदन दिलं आहे. यात चित्रिकरण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. 


या घडामोडी घडत असतानाच पठाण चित्रपटाचं चित्रिकरण पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली वेग पकडू लागल्या आहेत. दीपिका पडुकोणही बेंगळूरुमधून मुंबईत दाखल झाली आहे. इंडस्ट्रीत सुरू असलेल्या चर्चेनुसार येत्या चार जूनपासून अंधेरीतल्या यशराज स्टुडिओमध्ये या चित्रपटाचं काही चित्रिकरण करण्यात येणार आहे. सध्या उरलेल्या 30 टक्के चित्रिकरणापैकी बहुतांश चित्रिकरण याच स्टुडिओत करण्याबद्दल हालचाली सुरू आहेत. 


विशेष बाब अशी की पठाण या चित्रपटात सलमान खानही असणार आहे. यात तो पाहुणा भूमिकेत असून, तो या सिनेमात हेलिकॉप्टरमधून एंट्री घेणार आहे. यात तो टायगर याच भूमिकेत असणार आहे. याबद्दल अधिकृत कुणीच दुजोरा देत नसलं तरी पठाण चित्रपटाच्या क्रूमध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या सर्व टीमची चाचपणी सुरू झाली असून, आरटीपीसीआर, लसीकरण या गोष्टींची आता प्राधान्याने काळजी घेण्यत येणार असल्याचं कळतं. 

#AskSRK | 'भाई मन्नत विकणार का?' ; चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर शाहरुख खानचं हटके उत्तर


या सर्व गोष्टी फलद्रुप झाल्या तर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंद असलेलं शूटिंग जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याचे संकेत इंडस्ट्रीच्या पथ्यावर पडणारे आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Embed widget