शाहरुख खान क्वॉरंटाईन तर 'पठाण'च्या सेटवर कोरोना केसेसच्या बातम्यांनी खळबळ, बातम्या खोट्या असल्याची सूत्रांची माहिती
शाहरुख खान होम क्वॉरंटाईन आणि 'पठाण'च्या सेटवर कोरोना केसेस आढळळ्याच्या बातम्यांनी खळबळ. मात्र, ह्या बातम्या खोट्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
मुंबई : शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर फिल्म 'पठाण' या चित्रपटाच्या सेटवर कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर शाहरुख खान होम क्वॉरंटाईन झाल्याने पठाणची शूटिंग थांबवल्याच्या बातमीने आज खळबळ उडाली आहे.
आज एका इंग्रजी वेबसाइटने ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या चित्रपटाशी संबंधित एका विश्वासार्ह सुत्राने पठानच्या सेटवर कोरोना केसेस सापडणे आणि त्यानंतर शाहरुख होम क्वॉरंटाईन झालेच्या बातम्यांना फेटाळून लावले आहेत.
सुत्राचे नाव न छापण्याच्या अटीवर तो म्हणाला, की "चित्रपटाशी संबंधित सर्व क्रू मेंबर्स बायो बबलमधील हॉटेलमध्ये राहत आहेत आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती नाही. अशा परिस्थितीत शाहरुखला अलग ठेवण्याची बातमीही चुकीची आहे "
सूत्रांनी पुढे सांगितले, की “दोन दिवसांपूर्वीपर्यंत 'पठाण'चे शूटिंग समान रीतीने सुरू होते. काल म्हणजेच सोमवार आणि आज म्हणजे मंगळवार वेळापत्रकानुसार शूटिंग ब्रेक आहे. दोन दिवस शूटिंग नाही. दोन दिवसानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होणार आहे. बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या बैठकीत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय न घेतल्यास 'पठाण'च्या सर्व तारकांसह चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले जाईल.
या चित्रपटाचे शूटिंग त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार केले जात आहे आणि अशा कोणत्याही अफवांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
एबीपी न्यूजशी संपर्क साधल्यानंतर शाहरुख खानच्या टीमनेही ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.