SRK Jawaan Look Leaked: 'जवान' मधील शाहरुखचा लूक लीक; नेटकरी म्हणाले, 'हा पठाणपेक्षा जास्त...'
शाहरुखच्या (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) आणि जवान (Jawan) या दोन आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान या चित्रपटाच्या सेटमधील शाहरुखचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
SRK Jawan Look Leaked: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खास आहे. कारण त्याचे आगामी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. 25 डिसेंबर रोजी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं सात दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. आता शाहरुखच्या डंकी (Dunki) आणि जवान (Jawan) या दोन आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. यामधील जवान या चित्रपटाच्या सेटमधील शाहरुखचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखचा चित्रपटातील लूक दिसत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर पट्टी दिसत आहे. हा एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जवानच्या सेटवरील शाहरुखचा मॉनस्टर अवतार' या ट्वीटला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं लिहिलं, 'हा चित्रपट पठाणपेक्षा जास्त कमाई करेल.'
#SRK back on the sets of #Jawan today in his monster avatar pic.twitter.com/jre8fun2mo
— Harminder 🍿🎬🏏 (@Harmindarboxoff) January 31, 2023
This Film will Collect More Than Pathaan 🔥Mass
— Veer (@Veer_13_) January 31, 2023
2 जूनला जवान येणार प्रेक्षकांच्या भेटीस
ॲटलीनं जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जवान चित्रपटामध्ये विजय सेतूपती प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमीळ, हिंदी, तेलूगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनिरुद्ध रविचंदरनं या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात थलापती विजय देखील काम करणार आहे, असं म्हटलं जात आहे.
सोशल मीडियवर शाहरुखनं जवान चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. टीझर शेअर करुन शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये शाहरुख डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
पठाण चित्रपट ठरला हिट
शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, पठाण चित्रपटानं 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan Box Office Collection: 'पठाण'समोर केजीएफ आणि बाहुबलीही फिके; सात दिवसांत केली एवढी कमाई